विश्वास बसत नाहीय… 83 वर्षे झाली!

ज्येष्ठ पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर करत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. आहे. हा फोटो त्यांच्या पहिल्या शास्त्राrय गायनाचा आहे.

कॅप्शनमध्ये लता मंगेशकर यांनी लिहिलंय, ‘आज आमचे परिचित उपेंद्र चिंचोरे यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की तुम्ही पहिला क्लासिकल परफॉर्मन्स 9 सप्टेंबर 1938 रोजी सोलापूर येथे केला होता. तेव्हा प्रसिद्धीसाठी हा फोटो काढला होता. लतादीदींनी पुढे लिहिलंय, विश्वास होत नाहीय की, 83 वर्षे झाली गाणं गातेय.’