सॅमसंगने भारतात लाँच केले दोन स्वस्त आणि मस्त फोन

समसंग ने भारतात दोन नवीन स्मार्टफोन Galaxy F12 आणि Galaxy F02 लॉन्च केले आहेत. सॅमसंग Galaxy F12 मध्ये एक्सिनोस 850 प्रोसेसर, 6000 एमएएच बॅटरी आणि क्वाड-कॅमेरा सेटअप फीचर्स देण्यात आले आहेत. तर सॅमसंग गॅलेक्सी एफ 02 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप, 64 जीबी स्टोरेज सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीने हे दोन्ही फोन खास ऑफरसह लॉन्च केले आहेत. ज्यात Samsung Galaxy F12 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यात आयसीआयसीआय बँक क्रेडिटवर 1 हजार रुपयांची त्वरित सवलत आणि फोन खरेदीसाठी ईएमआयचा ऑप्शनही देण्यात आले आहे. हा फोन सेलेस्टियल ब्लॅक, स्काय ब्लू आणि सी ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे.

भारतात 12 एप्रिल रोजी फ्लिपकार्ट आणि सॅमसंगची अधिकृत वेबसाइटवर दुपारी 12 पासून सुरू होईल.

Galaxy F02 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल. याची विक्री 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल.

Samsung Galaxy F12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. हा फोन Android 11 आधारित वन UI 3.1 कस्टम स्किनसह येत. फोनला पॉवर देण्यासाठी 6000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4 जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएससारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोनमध्ये मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा प्राइमरी, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहेत. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F02 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले देण्यात आले आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.