Oppo F15 भारतात लॉन्च

दिल्ली: ओप्पो आपला नवीन स्मार्टफोन Oppo F15 (16 जानेवारी) लाँच करण्यात आला आहे. या फोनचा टीझर काही काळापूर्वी फ्लिपकार्टवर प्रसिद्ध झाला आहे, ज्यामुळे या फोनची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. 

हा नवीन फोन Oppo F15  Oppo F11 Pro  आणि Oppo F9 Proचे अपग्रेड म्हणून देण्यात येईल.

चीनमधील ओप्पो या स्मार्टफोन कंपनीने भारतात Oppo F15 हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अतिशय स्लिम असलेला या फोनचे वजन आहे फक्त, १७२ ग्रॅम. या फोनमध्ये VOOC 3.0 फ्लॅश चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन फक्त ५ मिनिटे चार्ज केल्यास सलग २ तास बोलता येईल असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत १९ हजार ९९० इतकी आहे.

 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेश्यो आहे २०:९. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ८ जीबी रॅमसह १२८ जीबीची इंटरनल रॅम देण्यात आला आहे. कंपनीने डिस्प्लेसाठी AMOLED पॅनलचा वापर केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio P70 प्रोसेसरवर चालणार आहे.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये चार रियर कॅमेरा सेटअप देण्याकत आला आहे. फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तर, दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, तसेच तिसरा २ मेगापिक्सलचा आणि चौथा देखील २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 9 Pie वर आधारित Color0s6 देण्यात आला आहे. सेल्फीसाठी Oppo F15 मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo F15 ची बॅटरी ४०००mAh ची देण्यात आली आहे. या सोबतच VOOC 3.0 फ्लॅश चार्जचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनी या स्मार्टफोनसोबत VOOC 3.0 फास्ट चार्जदेखील देत आहे.

हा फोन स्लिक बॉडी फोन ब्लॅक आणि व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर या फोनची प्री- ऑर्डर विक्री सुरू करण्यात आली असून २४ जानेवारी पासून हा फोन ग्राहकांच्या हातात येणार आहे.