IPL 2021: मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) विकेटने सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) दणदणीत 13 विजय मिळवला आहे.

मुंबईने दिलेल्या 151 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादची ‘ऑरेंज आर्मी’ 137 धावाच करू शकली ज्यामूळे संघाला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे.

विशेष म्हणजे चेपॉकवर स्टेडियमवर झालेल्या मागील तीन सामन्यातील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला असून या मैदानावर संघाला एकदाही सामना जिंकता आलेला नाही.

संघासाठी जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक 43 धावा केल्या तर कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) 36 धावा आणि विजय शंकरने 28 धावांचे योगदान दिले.

दुसरीकडे, मुंबईकडून राहुल चाहरने (Rahul Chahar) पुन्हा एकदा चेंडूने आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली. मुंबईसाठी राहुल आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह आणि  कृणाल पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.