IPL 2021: CSK Vs SRH चेन्नईचा हैदराबाद वर एकतर्फी विजय

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्ससाठी मनीष पांडेने 61 धावांची खेळी केली. तर कर्णधार डेविड वॉर्नरने 57 धावा केल्या. शिवाय, केन विलियमनसनने 26 धावांची छोटेखानी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली पण गोलंदाजांच्या अपयशामुळे संघ दुसरा विजय मिळवण्यात अपयशी ठरला.

फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि रुतुराज गायकवाडच्या  (Ruturaj Gaikwad) धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने  (Chennai Super Kings) आयपीएलच्या (IPL) 22 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.

हैदराबादचा 6 सामन्यांपैकी हा पाचवा पराभव ठरला आहे तर चेन्नईचा सहा सामन्यातील पाचवा सामना जिंकला आहे.

हैदराबादने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून सनरायझर्सना लोळवलं. रुतुराजने सर्वाधिक 75 धावा केल्या तर फाफ डु प्लेसिसने 56 धावांचे योगदान दिले. सुरेश रैना 17 धावा आणि रवींद्र जडेजा 7 धाव करून नाबाद राहिले. दुसरीकडे, हैदराबादसाठी एकटा राशिद खान गोलंदाजीने प्रभावित करू शकला. हैदराबादच्या या युवा फिरकीपटूने 3 विकेट काढल्या.