
क्विंटन डी कॉकच्या नाबाद 70 धावांच्या तुफान अर्धशतकी खेळीने संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतवले. राजस्थान संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 24 व्या सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमवून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात डी कॉकने 12व्या ओव्हरमध्ये 35 चेंडूत मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. डी कॉकने कृणाल पांड्याच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ नेले पण निर्णायक क्षणी कृणाल तंबूत परतला. अशास्थितीत डी कॉक आणि कीरोन पोलार्डच्या छोटेखानी खेळीने मुंबई इंडियन्सला हंगामातील तिसरा विजय मिळवून दिला.











