Tokyo Olympics 2020: हॉकीच्या सामन्यात भारताचा जर्मनीवर विजय, चार दशकानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला ब्रॉंझ पदक

अटीतटीच्या सामन्यात भारताने आपलं वर्चस्व कायम ठेवत जर्मनीवर विजय मिळवला आहे. भारताने जर्मनीवर 5-4 अशी मात केली आहे. आता या विजयानंतर भारतीय हॉकी टीमने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे.

जर्मनीने आक्रमक सुरुवात करत भारताविरुद्ध पहिला गोल करून आघाडी घेतली, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं गोल करून बरोबरी साधली.

त्यानंतर जर्मनीने सलग दोन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. मात्र भारतानेही दोन गोल केले. दोन्ही संघ आपआपल्या गटांमध्ये दुसऱ्या स्थानावर होते. मात्र भारताला केवळ एका पराभवाचा सामना करावा लागला होता. तर जर्मनीचा मात्र दोन सामन्यांत पराभव झाला होता.

तब्बल 41 वर्षांनंतर भारताची हॉकीमधली पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. भारतीय पुरुष संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत कांस्य पदक मिळवलं आहे