पालघर रेल्वे स्थानकात “Corona Care Coach” चे उद्घाटन !

पालघर जिल्ह्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता खासदार राजेंद्र गावित व जिल्हाधिकारी श्री माणिक गुरसळ यांच्यातर्फे रेल्वे कोच विलगीकरणं काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरूपात ५ डब्यात सोय केली आहे. एकूण ८० खाटांची सोय केली आहे त्यात १० oxygen खाटा आहेत. जेवण आणि औषधे मोफत उपलब्ध होणार आहे. रेल्वे मंत्री पीयुष गोयल व पश्चिम रेल्वे प्रशासनाचे आभार. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था यांचा पाठपुरावा यशस्वी झाला त्यांचे आमची वसई रूग्ण मित्रांतर्फे अभिनंदन.

सदर उदघाटन कार्यक्रमास प्रशासनामार्फत आमची वसई सामाजिक संस्थेस निमंत्रित करण्यात आले होते. आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे व पराग तोडणकर, पुरुषोत्तम देवधर, देवेंद्र गुरव इ सदस्यांनी जिल्हाप्रशासन व रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सुविधेचा आढावा व माहिती घेतली तसेच वसई नालासोपारा विरार स्थानकावर ही अशी सेवा रेल्वे व जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली .