महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. १६ तारखेला हे चक्रीवादळ येणार असून केरळ, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक या भागांमध्ये याचा प्रभाव दिसून येईल. हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. या चक्रीवादळाचा धोका मुंबईला नसेल. कारण चक्रीवादळाची दिशा ही आखाती देशाकडे असल्याचेदेखील सांगितले जात आहे.

2021 मधील पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वैधशाळाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ते यांनी सांगितले. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.