Cyclone Tauktae: पुढील काही तासात चक्रीवादळ ‘अतिजास्त तीव्रते’मध्ये रुपांतरीत होणार

तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून, उत्तर-वायव्य दिशेला सरकत असून गेल्या सहा तासात ताशी 11 किमी वेगाने त्याची वाटचाल झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 15 मे 2021 रोजी सकाळी  8.30 वाजता त्याचे स्थान 12.8° उत्तर अक्षांश आणि 72.5°पूर्व रेखांशाजवळ होते. हे ठिकाण अमीनदीवी बेटापासून सुमारे 190 किमी उत्तर-वायव्य, पणजीच्या दक्षिण-नैऋत्येला 330 किमी आणि गुजरातमधील वेरावळपासून 930 किमी तसेच पाकिस्तानमधील कराची पासून 1020 किमीवर होते. यावेळी वाऱ्याचा वेग 175 किमी प्रतितास असेल. या चक्रीवादळामुळे केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल.

पुढील काही तासात या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची आणि त्यापुढील 7-8 तासात अतिजास्त तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते उत्तर-वायव्य दिशेला सरकण्याची खूपच जास्त शक्यता असून, 18 मे रोजी ते दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातमध्ये पोरबंदर आणि नलियादरम्यानची  किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.