

कोरोनाची पहिली लाट भयंकर होती तर दुसरी लाट महाभयंकर आहे. महमारीच्या या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केले होते. अनेक लहान मुलांना कोरोना महामारीचं संकट सोसावं लागलं. गरीब आणि वंचित मुलांचं कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना मोफत कापडी उच्च दर्जाचे फेस मास्क वाटप करण्यात आले. तसेच ईद आणि अक्षय तृतीया सणाचं औचित्य साधून मफिन केक वाटप करण्यात आले.

प्रगती फाऊंडेशन संस्थेचे समन्वयक श्री मुकेश विश्वकर्मा यांनी मुंबई उपनगरातील चाळीत राहणाऱ्या गरजू मुलांना फेस मास्क वाटप केले.












