
जून महिन्यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहेत. सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमातून या महिन्यात भरपूर मनोरंजन होणार आहे. यात बहुप्रतीक्षित ‘द फॅमिली मॅन-2’पासून विद्या बालनच्या ‘शेरनी’ सिनेमाचा समावेश आहे. फरहान अख्तरचा ‘तुफान’ सिनेमाही याच महिन्यात डिजिटली प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
अभिनेता मनोज वाजपेयीची ‘द फॅमिली मॅन-2’ ही वेबसिरीज ऍमेझॉन प्राईम व्हिडियोवर 4 जून रोजी येत आहे. धनुषचा ‘जग में थंदिरम’ 18 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. ‘लोकी’ ही वेबसीरीज डिस्नी प्लस हॉटस्टारवर 9 जूनपासून बघता येईल.
विद्या बालनच्या ‘शेरनी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात विद्या एका करारी वन अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे. ‘शेरनी’चे दिग्दर्शन अमित मसूरकर यांनी केलेय. यातून मनुष्य आणि पशू यांच्यातील संघर्षाचा वेध घेण्यात आला आहे.











