मेरिललाची कोविड-19 सेल्फ-टेस्ट कोविफाइंडसाठी आयसीएमआरची मंजुरी

कोविड-19चे निदान करणाऱ्या सेल्फ-यूज रॅपिड अँटिजेन टेस्टला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरी दिली आहे, अशी घोषणा गुजरातमधील वापी येथील जागतिक मेडटेक कंपनी मेरिलने आज केली.

एतद्देशीय संशोधन व विकासातून तयार करण्यात आलेली ही चाचणी प्रादुर्भावित व्यक्तीमधील सार्स-सीओव्ही-टू विषाणूचे निदान खात्रीशीररित्या करू शकते आणि कोविड-19 आजाराची लक्षणे दाखवणाऱ्या व्यक्तींच्या तसेच कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचणीसाठी आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार वापरली जाऊ शकते.

मेरिलची घरी करण्याजोगी रॅपिड अँटिजेन चाचणी देशातील कोविड-19 तपासणीची व्याप्ती वाढवण्यात मदत करेल. त्याचप्रमाणे कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी तपासणी व तिची वारंवारता वाढवण्याच्या राष्ट्राच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. उच्च दर्जाच्या रॅपिड अँटिजेन टेस्टिंगची तरतूद झाल्यास यापूर्वी व्याप्तीबाहेर असलेल्या तसेच साधनांची सुसज्जता नसलेल्या भागांमध्येही चाचण्या करणे शक्य होईल.

मध्यम ते तीव्र व्हायरल लोड असलेल्या व्यक्तींमधील प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी घरच्या घरी स्वत: तपासणी करण्याची सुविधा देणारी कोविफाइंड चाचणी खूपच प्रभावी आहे. मध्यम ते तीव्र व्हायरल लोड असलेल्या व्यक्तींकडून हा आजार दुसऱ्यांकडे संक्रमित होण्याची शक्यता खूप अधिक असते. प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींचे विलगीकरण, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून काढणे व गरज असल्यास त्यांच्यावर उपचार करणे या सगळ्यासाठी त्वरित निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या चाचणीचा निकालही झटपट येतो. केवळ १५ मिनिटांत ही चाचणी अचूक निदान करते. याशिवाय या चाचणीची साधने विशिष्ट पद्धतीने साठवण्याची किंवा रेफ्रिजरेट करण्याचीही गरज नाही. त्यामुळे तिचे वितरण सोपे व सोयीस्कर आहे.

चाचणी साधनाची किंमत २५० रुपये आहे आणि ती परवडण्याजोग्या सिंगल पॅकमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय ३, ५ आणि २५ टेस्ट किट्सचे अतिरिक्त खरेदी पर्यायही उपलब्ध आहेत.

प्रत्येक टेस्ट किटमध्ये चाचणीचे साहित्य आहे. यात एक चाचणी उपकरण, एक निर्जंतुक नेजल स्वॅब आणि एक पूर्वीच भरलेली बफर ट्युब व कॅप असे साहित्य आहे. यासाठी कोणत्याही अतिरिक्त उपकरणाची गरज नाही. किटमध्ये वापराच्या सूचनांचे (आयएफयू) पत्रक असेल. त्यात प्रशासन प्रक्रियेची प्रत्येक पायरी तपशीलवार दिलेली असेल, टेस्ट किटची हाताळणी व विल्हेवाट यांबद्दलही माहिती या पत्रकात दिलेली असेल. याशिवाय एक डिसपोजेबल बॅग असेल.

टेस्ट किट वापरल्यानंतर नेजल स्वॅब दिलेल्या लिसिस बफर नळीत इन्सर्ट करावा लागेल. यामध्ये सार्स-सीओव्ही-टू आणि अन्य विषाणू निष्क्रिय केले जातात. त्यानंतर नळी व चाचणीचे अन्य साहित्य दिलेल्या डिसपोजेबल बॅगमध्ये ठेवायचे. सुरक्षित विल्हेवाटीसाठी आवश्यक असलेली उच्चस्तरीय बायोकंटेन्मेंट या बॅगमुळे होईल.

ही 15 मिनिटांत झटपट निदान करणारी एक साधी, कमी इन्वेसिव, नेजल स्वॅबवर आधारित चाचणी, मेरिलच्या ‘कोविफाइंड’ या मोबाइल अॅपवर तपशीलवार मार्गदर्शन उपलब्ध
• मध्यम ते उच्च व्हायरल लोडचे निदान करणारी अत्यंत प्रभावी चाचणी

कोविड-१९ चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची वाढती मागणी कोविफाइंड पूर्ण करते, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तसेच लॅब-टेस्टिंग संरचनेवरील ताण कमी करण्यासाठी एक सहज उपलब्ध होण्याजोगा व परवडण्याजोगा पर्याय.
• प्रतिचाचणी किंमत २५० रुपये, हे साधन दोन आठवड्यांत थेट ऑर्डर्स घेण्यासाठीच्या डेडिकेटेड वेबसाइटमार्फत भारतभरातील फार्मसींमध्ये, ऑनलाइन फार्मसींमध्ये, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल