Tokyo olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांचे आयोजन संपुष्टात; अमेरिका क्रमांक 1,भारत टोकियो ऑलिम्पिकच्या पदक तक्त्यात 48 व्या स्थानावर

टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या पदक तालिकेत अमेरिकेने अखेर चीनला मागे टाकले. दरम्यान, अमेरिका 39 सुवर्ण आणि 113 पदकांसह अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर 38 व्या सुवर्णसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे आणि 27 सुवर्णांसह यजमान जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, भारताने टोकियो गेम्समध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदके जिंकून आपली मोहीम संपवली. कोणत्याही एका ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 100 पदके जिंकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे, तर 38 सुवर्ण, 32 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकूण 88 पदकांसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे. यजमान जपानने 27 सुवर्ण, 4 रौप्य आणि 17 कांस्य अशा एकूण 58 पदकांसह तिसरे स्थान कायम राखले.22 सुवर्ण,21रौप्य आणि 22 कांस्य अशा एकूण 65 पदकांसह ग्रेट ब्रिटन चौथ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1सुवर्ण,2 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकून आपली मोहीम संपवली. कोणत्याही एका ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने 6 पदके जिंकली होती. अशाप्रकारे टोकियो ऑलिम्पिकमधील पदक तालिकेत भारत 48 व्या स्थानावर आहे.

टेकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 खेळाचा आज अंतिम दिवस पार पडला. आज सर्व देश ऑलिम्पिक व्हिलेजमधून मायदेशी परततील आणि नंतर 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भेटतील. टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा टोकियोच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये सध्या सुरु असून भारताचा कुश्ती कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने (Bajrang Punia) स्टेडियममध्ये भारताचे (India) नेतृत्व करत तिरंगा उंचावला. सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय दल (Indian Contingent) खूप आनंदी दिसत होते. भारताच्या दृष्टिकोनातून हे ऑलिम्पिक ऐतिहासिक ठरले कारण या खेळांमध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली. भारताने एकूण सात पदके मिळवली. भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदकांचा चार दशकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये देशाचे पहिले सुवर्णपदक पटकावले.

यासह आज टोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांचे आयोजन संपुष्टात आले आहे आणि आता प्रत्येकाचे लक्ष 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांकडे असेल. फ्रान्सची राजधानी पॅरिसकडे धुरा सोपवली जाईल. टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या समापन समारंभात ऑलिम्पिक स्टेडियममधून फटाक्यांनी संपूर्ण आकाश उजळून निघाले. मात्र, ऑलिम्पिक स्टेडियममध्ये नेत्रदीपक प्रकाश प्रदर्शन, फटाके आणि नंतर ऑलिम्पिक रिंग्जचे प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्व देशांचे ध्वजधारक आपापल्या देशाचा ध्वज घेऊन स्टेडियममध्ये उतरले. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समापन सोहळ्यात देखील ग्रीस देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला कारण ग्रीसमध्ये ऑलिम्पिकचा जन्म झाला आहे.