
राज्यातील जळगावात डेल्टा प्लसचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. तर, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 11 जणांची कोविड-19 डेल्टा प्लस व्हेरिअंटची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात रविवारी माहिती दिली आहे. तसेच “जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवलेल्या 80 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस फॉर्मच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे, असे विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 45 रुग्णांपैकी जळगाव (13), रत्नागिरी (11), मुंबई (6), ठाणे (5), पुणे (3) आणि पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमधील प्रत्येकी एक आहेत. यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणे आहेत. जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यांची नेमकी संख्या आणि वेळ सांगण्यात आलेली नाही.











