
सहा वर्षांपूर्वी बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident) मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीला भरपाई म्हणून 55 लाख रुपये देण्याचा आदेश न्यायाधिकरणानं दिला आहे. संबंधित महिला ही TCS Vigilance Scientist होती. मुंबई (Mumbai) मधील बीकेसी (BKC) येथे या महिलेसह तिच्या मैत्रिणीला बेस्ट बसने धडक दिली होती. या अपघातानंतर मृत महिलेचे पती पियुष कोठारी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती. अखेर 6 वर्षानंतर न्यायधिकरणाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर कोठारी यांना न्याय मिळाला आहे.
27 जून 2015 मध्ये हा अपघात झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात संध्या यांच्या पतीने मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेत न्यायासाठी तब्बल 6 वर्ष लढा दिला. अखेर सहा वर्षांनंतर न्यायाधिकरणानं मृत महिलेच्या पतीला बेस्टने 55 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.











