उद्योग जगतात नवीन आगाज TECCIA: ट्रान्सग्लोबल एंत्रोप्युनर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीज फाँर अँग्रीकल्चर (टेकिया) संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

ट्रान्सग्लोबल एंत्रोप्युनर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीज फाँर अँग्रीकल्चर (टेकिया) या संस्थेचा प्रथम वर्धापन केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता- राज्यमंत्री भारत सरकार) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता एम.टी.डी.सी.रेसिडेन्सी, सेक्टर-१२, खारघर, नवी मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला.


सदर वर्धापन दिनासाठी माजी मंत्र्री् श्री अविनाश महातेकर (माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री), श्री.जगदीश गायकवाड (उपमहापौर- पनवेल महानगरपालिका), श्री.जयेश खाडे (मा.सल्लागार-वर्ड ड्रेड सेंटर), श्री.दीप सिंह (व्यवसाय प्रमुख- येस बँक) यांच्या उपस्थितीत पार पडला.

नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तसेच आपल्या व्यवसायाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याऱ्या उद्योजकांना एक नवीन ओळख, तसेच नवा मार्ग देण्यासाठी चेंबर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. अवघ्या वर्षभरात चेंबर ने अनेक नव उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना स्थिर स्थावर करण्याचे मोलाचे कार्य केले आहे. चेंबर मार्फत नव उद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी सहकार्य करणे, उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल मिळवून देणे, बँका तथा इतर संस्थांकडून कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून देणे, विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देणे आणि नव उद्योजकांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचं काम चेंबर मार्फत होत आहे अशी माहिती चेंबर चे प्रमुख सल्लागार किरण राणे यांनी उपस्थितींना दिली.

याशिवाय चेंबर विविध संस्थांबरोबर करार करून कौशल्य विकास आणि उद्योजकता यावर आधारीत प्रशिक्षण देखील देणार असल्याची माहिती दिली. चेंबर प्रस्थापित उद्योजक आणि नव उद्योजक यामधील दुवा म्हणून काम करणार असल्याचे सांगण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. रााामदास आठवले यांनी चेंबरच्या वर्षपूर्ती निमित्ताने चेंबर ला शुभेच्छा दिल्या. भारतामध्ये आर्थिक विकास करावयाचा असेल तर असे चेंबरच्या मदतीनेच ते शक्य होईल. चेंबरचा प्रवास हा आर्थिक सबलीकरणाच्या मार्गाचा आहे आणि यामुळे नवीन व्यावसायिक निर्माण होतील ह्यात शंका नाही असे त्यांनी सांगितले. आपल्यासाठी सदैव सोबत असेल, जिथे माझी गरज असेल येथे मी आपणांस मदत देईन असेही आश्वासन दिले.

पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड आपल्या सदिच्छापर भाषणात सांगितले की, असे व्यवसायिक निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातुनच आपली प्रगती होईल. आपले काम नक्कीच अभिमानस्पद आहे. आपल्या हातून नवीन उद्योजक तयार होत आहेत आणि असेच होत राहावे हीच ईच्छा प्रकट केली.

माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले की,आम्ही राजकारणात असे उपक्रम राबवू शकलो नाही आणि राबविले तरी कोणी उपस्थित राहणार नाही मात्र आपण अशा चेंबर द्वारे जे काम करत आहात ते खूपच सुंदर आहे. सरकारी मदतीसाठी आम्ही सोबत आहोत. आज समाजामध्ये असे उद्योजक तयार होणे गरजेचे आहे.


फादर एग्रेल कॉलेज चे प्राचार्य मंगेश मोहन यांनी कमी पैशामध्ये आपल्या कॉलेजमध्ये सर्व सामन्यासाठी सुविधा आहेत. आपण त्यांचा फायदा घेण्याचे आवाहन केले. आपण पुढील सर्व काळासाठी चेंबर सोबत जात आहोत असे जाहीर केले.

येस बँकेचे व्यवसाय प्रमुख दीप सिंह यांनी आपण चेंबर सोबत भविष्यात काम करण्यासाठी सुमारे पाचशे करोडचा करार केलेला आहे त्याचा आपण सर्व व्यवसायिकांनी चेंबरच्या मदतीने ह्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.

बी.ए.आर.सी.चे एम.डी.वैज्ञानिक अधिकारी डॉ.मिलिंद लंकेश्वर यांनी आपण यापुढे चेंबर सोबत काम करणार असल्याचे सांगितले.

हेमंत सुटे(शिक्षण नियोजन आणि समुपदेशन), अभिनेत्री कोमल धांडे, लोक जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष रवी गरुड, रिलायन्स जीआयसी चे व्यवसाय प्रमुख रोहित मुक्कर यशा दिग्गज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली. प्रत्येकाने उपस्थित नव उद्योजकांना मार्गदर्शन केले व चेंबर ला शुभेच्छा दिल्या.

सुमारे तीन तास चाललेल्या ह्या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी त्यांच्या वैचारिक वाणीने अत्यंत सुसूत्रतेने केले. ट्रान्सग्लोबल चेंबर ची संकल्पना ही चंद्रकांत जगताप यांचीच आणि देशात उद्योजग निर्मितीसाठी चळवळ निर्माण व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरापूर्वी चेंबरची निर्मिती केली.

यावेळी चेंबर ने लक्ष्यापूर्ती फेडरेशन या महिला सक्षमीकरण क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या संस्थेसोबत तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सी एस आर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या प्रगती फौंडेशन या संस्थेसोबत करार करून या दोन्ही संस्था चेंबर च्या सहयोगी संस्था असल्याचे चंद्रकांत जगताप यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात चेंबरचे प्रमुख सल्लागार किरण राणे यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


चेंबरच्या माध्यमातून आपली मासोळी आणि सब्बा केअर अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड(सॅनिटरी नॅपकिन) हे दोन व्यवसाय फ्रेच्याइसी मॉडेल रूपाने मार्केटसाठी सुरू करण्यात आले.

चेंबरची माहिती देणारे माहिती पुस्तिका ना रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.तसेच चेंबरच्या लोगोचे देखील अनावरण करण्यात आले. चेंबरच्या सर्व टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

चेंबरचे संस्थापक व अध्यक्ष चंद्रकांत जगताप, सल्लागार किरण राणे, खजिनदार संदेश उघडे, उपाध्यक्ष मंजूषा परब, संचालक पंकज गांगुर्डे, सचिव तुषार कोचारेकर, सह सचिव मालती शर्मा, संचालक सचिन निकाळजे, संचालक राजेंद्र भिसे, संचालक अनामिका माने, समन्वयक तुषार नेवरेकर, समन्वयक जयसिंग सुतार, पुणे विभागीय अधिकारी सदानंद कडलूक, आणि संतोष गायकवाड आदी सभासद चेंबर च्या वर्धापन दिन यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेत होते.