वेदनादायक: CDS जनरल बिपीन रावत यांचे अपघातात दुःखद निधन

तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-17हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते.त्यांचे अपघातात दुःखद निधन झाले आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आज झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ते त्यांच्या पत्नीसह अन्य 11 अधिकारी ठार झाले. भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

भारतीय हवाई दलाने सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या अपघातात पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज त्यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला. त्यांची पत्नी मधुिलका रावत याही त्यांच्या सोबत होत्या.
हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे हवाई दलाने ट्विट केले आहे.

तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस रावत आणि त्यांची पत्नी आणि अन्य 11 अधिका-यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे, असे त्यांनी ट्विट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (CCS) बैठक बोलावली आहे. या बैठकीला पंतप्रधानांव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सदस्य उपस्थित राहणार आहेत.