
नुकतेच मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आ.सौ.श्वेताताई महाले पाटील,मा.आ.धृपदराव सावळे, जिल्हा सरचिटणीस योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनात धामणगाव येथे भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख यांनी मासरुळ जिल्हापरिषद सर्कल मधील भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या जेष्ठांचा सन्मान सोहळा तसेच गौरव सभा आयोजित केली होती. गौरव सभाची धामणगावातील सर्व मंदिरात वाजत गाजत जाऊन दर्शन घेऊन सुरवात करण्यात आली. सन्मान सोहळा मा.आ.विजयराज शिंदे, श्री.अंकुशराव पडघन, शेतकरी संघटनेचे नेते नामदेवराव जाधव यांच्या प्रमुख उपथिती मध्ये संपन्न झाला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव पाटील, दत्ता पाटील, सरपंच दुर्गाबाई सुरडकर, गणेश मोरे आदी मान्यवर उपस्तित होते. यावेळी सर्व सत्कार मूर्ती जेष्ठांनी आपली मनोगत आपला अनुभव आपल्या भाषणातून मांडला हे सर्व काही सांगत असताना भावुक झालेल्या मा.तालुकाध्यक्ष तेजराव पाटील धंदर यांनी ॲड.सुनील देशमुख यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याचे कौतुक केले या सत्कार सोहळ्या मुळे जेष्ठांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे उपस्थितांमध्ये दिसून आले.

यावेळी श्री.बाळाभाऊ वाघमारे श्री.तेजराव जाधव, श्री.सखाराम जाधव, श्री.अंबादास जाधव, श्री.राजाराम कानडजे, श्री.शालिकराम कानडजे, श्री.दिवानसिंग जाधव, श्री.रामराव घोरपडे, श्री.कवरसिंग जाधव, श्री.विष्णू आहेर, श्री श्यामदादा शिंबरे, श्री.उत्तमराव शिंदे, श्री.नारायण धांदर, श्री.तेजराव धंदर, श्री.हरिभाऊ उबाळे, श्री.प्रभाकर तायडे, श्री.शिवाजी तायडे, श्री.भगवान पिंपळे, श्री.रामदास पिंपळे, श्री.एकनाथ पिंपळे, श्री.गजानन देशमुख, श्री.शिवाजी वासे, श्री.सुखदेव माटे, श्री.विष्णू जातोड, श्री.फकिरा कचाटे, श्री.पांडुरंग आंधळे, श्री.साहेबराव जायभाये, श्री.नामदेव तायडे, श्री.सुभाष देवकर, श्री.मधुकर सपकाळ, श्री.काशिनाथ टाकसाळ, श्री.सीताराम पायघन, श्री.नारायण सिनकर, श्री.अशोकराव भगत, श्री.विश्वासराव देशमुख, श्री.पंडित फुसे, श्री.नारायण सावळे, श्री.विठ्ठल बोडखे, श्री.नामदेव नरोटे, श्री.गोविंदा कापसे, श्री.कडुबा नरोटे, श्री.मोतीलाल बारवाल, श्री.सयाराव नरोटे, श्री.राजू राजपूत, श्री.राजू हजारे, श्री.सुदाम जेयवाल, श्री.मंगल चांदा, श्री.जमसिंग भोपळे, श्री.पुंडलिक सपकाळ, श्री.शेषराव कारंजकर, श्री.नारायण गोरे, श्री.शालिकराम राऊत, श्री.साहेबराव राऊत, श्री.श्रीकृष्णा भिवसनकर इतर जेष्ठांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन करण्यात आला.
जेष्ठांच्या आशीर्वादाचा व अनुभवाचा फायदा हा नक्कीच आपल्याला यश मिळवून देण्यासाठी महत्वाचा ठरेल :- मा.आ.विजयराज शिंदे .
मोदी सरकारची ८ वर्ष म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाची ८ वर्ष असून खर्यार्थाने जरका सर्वसामान्य जनतेला त्यांचे मूलभूत हक्क अधिकार कोणी त्यांना दिले असेल तर ते म्हणजे मोदी सरकारने. पक्षाचे २ वरून ३०१ खासदार करून केंद्रात भाजपाची सत्ता आण्यात याच जुन्या जाणत्या जेष्ठांचा मोलाचा वाटा आसुनू याच जेष्ठांनी आता जिल्हापरिषद मध्ये देखील भाजपाचे उमेदवार निवडून आण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय व्हावे आपल्या अनुभवाचा फायदा हा नक्कीच आपल्याला यश मिळवून देण्यासाठी महत्वाचा ठरेल. तसेच मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मधील भ्रष्टाचार बघता चोर है भाई चोर है ठेकेदार चोर है हे वास्तव वादी घोषणा कार्यकर्त्यांनी गावा गावात घेऊन जात मतदारांमध्ये शाश्वत विकासासाठी जनजागृती करावी. 4-5 वर्ष बोगस बिले काढायची निवडणुका आल्या की नारळ फोडत फिरायचं जनता आता हुशार झालेली आहे मागचे अनुभव त्यांच्या लक्षात आहे ते नक्कीच भ्रष्टाचार्यांना मतदानातून धडा शिकवल्या शिवाय यंदा शांत बसणार नाही मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मध्ये परिवर्तन हे अटळ असून भाजपा कार्यकर्त्यांनी लीड साठी खर्यार्थाने कामाला लागावे.
शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या सर्वच पक्षांना मतदानातून धडा शिकवावा :- शेतकरी संघटनेचे नेते नामदेवराव जाधव
बुलडाणा तालूका भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या धामणगाव धाड येथील सन्मान सोहळा समारंभास संभोदीत करताना शेतकरी संघटनेचे नेते श्री.नामदेवराव जाधव यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मोदी यांनी आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या सर्वच राजकिय पक्षांना आपल्या मतदानातून धडा शिकवावा तसेच पुह्या ह्या देशात नरेंद्र मोदी यांना शेतकरी कायदा देशात लागू कार्यासाठी त्यांचे हात गल्ली ते दिल्ली पर्यंत मजबूत करावे अशे आव्हान केले.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आपल्या देशाला लाभलेले जन कल्याणकारी नेते :- ॲड.सुनील हासनराव देशमुख
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात देशात भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या सरकारला ८ वर्ष झाली या ८ वर्षात हजारो अशे लोकाभिमुख निर्णय मोदी सरकारने घेतले ज्याने भारतातील सर्वसामान्य माणूस हा सर्वार्थाने समृद्ध होऊन देश हा जागतिक महासत्ते कडे वेगाने मार्गक्रमण करत आहे. ५० लक्ष कोटी रुपयाचे आंतराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बांधण्यात आले, ८० कोटी जनतेला मोफत राशन पुरवठा, घरकुल योजनेतून ग्रामीण भागातील जनतेला २.८० करोड घराणं मंजुरी, ग्रामीण भागात ११.२२ करोड स्वच्छालयाना मंजुरी, जलजीवन मिशन योजनेतून ग्रामीण भागात नवीन नळ जोडणी ६. २ करोड व ६५ हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला, आयुष्मान भारत योजने अंतर्गत ३२ करोड लोकांना ५ लक्ष रुपया पर्यंत मोफत उपचार तसेच १८ करोड जनतेला आयुष्मान भारत कार्डचे वाटप, १९० कोटी कोरोना लसीचे मोफत वितरण, PM किसान सन्मान निधी अंतर्गत ११. ५ कोटी परिवारांना १. ८२ लक्ष करोड रुपये वाटप केले, DAP खतांवरील सबसिडी १२०० वरून २४०० रुपयाची वाढ केली, राम मंदिर निर्माण, काशीविश्वनाथ मंदिर तसेच केदारनाथ धमाचे नूतनीकरण केले, ३७० कलाम हटवून जम्मू काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित असलेल्या ५ स्थळांना पंच तीर्थ म्हणून विकसित केले तसेच बाबासाहेबाना श्रद्धांजली अर्पण करून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून घोषित केला तसेच बाबासाहेब यांचे वास्तव्य असलेल्या इंग्लंड मधील घर व मुंबई मुबई येथील इंदुमीलची जागा व महू येथील स्थळांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन विकसित केले या व अशे अनेक निर्णय व योजना मोदी सरकारने या ८ वर्षात घेतले. यावेळी उपस्तित ओबिसि आघाडी तालुकाध्यक्ष अनिल पाटील जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सूर्यदेव काकडे, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण पाटील धंदर, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष गणेश पांडे, भाजपा तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर राजपूत, भाजपा तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पायघन, चिटणीस समाधान आघाव, राजू अपार, शुभम भुतेकर, रवी काळे, कमलाकर उबाळे, संजय देशमुख, पंडित नरोटे, दिनकर नरोटे, शरद देशमुख, सतीश भाकरे पाटील, सोपान जगताप, सुनील घोडकी, सतीश कानडजे, गजानन काळे, गजानन जाधव, अमोल ताठे, अर्जुन लांडे, महेंद्र देशमुख, रामेश्वर आल्हाट, गोपाल देवकर पाटील, प्रदीप टाकसाळ, अरुण बोडखे, संतोष पालकर, अनिल पालकर, भागवत पालकर, अनिल बोराडे, अविनाश क्षीरसागर, सुरेश भिवसनकर विठ्ठल जाधव, कमलाकर उबाळे, संदीप काळे, विनोद राऊत, वाल्मिक कानडजे, उत्तम कानडजे, संजय झुंबड, अनंता डुकरे, सुनील पवार अमोल बरवाल, इंद्रनाथ मांटे, गजानन काळे, तसेच मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मधील सर्व मोर्चा व आघाडी तील आजी,माजी पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते.











