मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा : डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 14

मिसिसॉगातील जीवनशैली, राहाणीमान, आणि एका कुटुंबावर येणारा सरासरी खर्च

मिसीसागातील जीवनशैली, राहाणीमान, आणि एका कुटुंबावर येणारा सरासरी खर्च: मिसीसागा हे शहर ऑटोरिया प्रातांतील टोरांटो पासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. हे शहर जगातील टॉप दहा सर्वाधिक महागड्या खर्चिक शहरात समावेश होतो.


कॅनडात प्रवेश करण्यास पी.आर.टेस्ट द्यावी लागते हे ज्ञात आहेच. ( टूरीस्ट वीजा वेगळा ) आजच्या माझ्या निरीक्षणातून जे काही जाणवले ,उमजले त्याचे रेखाटन करीत आहे.


सर्व साधारणत: एका जोडप्यास महिन्यास कसा आणि किती प्रकारचा खर्च येतो ते पाहू या!

येथे अपार्टमेंट, बिल्डिंग मधील फ्लॅट, बंगले अशा प्रकारची घरे भाड्याने मिळू शकतात. काही बंगल्याचे मालक आपल्या बेसमेंटला स्वतंत्र प्रवेश द्वार महापालिकेची रितसर परवानगी घेऊन भाड्याने देतात. येथे वन बी एच.के किंवा अपार्टमेंटचा दरमहा भाडे भारतीय चलनात लाखाच्या वर जाते.(2300/ कॅनडीयन डाॅलर, बेसमेंटचे भाडे 1500/ जरा कमी असते)
येथील वीज वितरणला हायड्रो म्हणतात. तुमच्या घरापर्यंत वीज वाहून आणली जाते आणि तुम्ही वापरलेले युनीट याचा दर आकारण्यात येते. त्याचा खर्च 50/60 डाॅलर असतो.(एक डाॅलर म्हणजे 62 रूपये) त्यानंतर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन मस्टच, जोडणी सह हजारोवर जातो. त्यातही विविध पॅकेज असतात.

कपडे धुण्यासाठी बिल्डिंगमध्येच वाॅशिंग मशीन, डायर्स उपलब्ध असते तेथे आठवड्यातून एक वेळ जरी कपडे धुवून घेतले त्याचा खर्च किमान वीस डाॅलर येतो. काॅमन लाँड्री हा पर्याय येथे असतोच.


आता येथे जे दोघेच पती पत्नी राहात आहेत त्यांच्याच मासिक खर्चाचे रेखाटन आहे आणि सर्व अंदाजीत आहे.


आता फूड बाबत. येथे कम्युनिटी सेंटर मध्ये हवे ते आपल्या आवडीनुसार आणि खिशाला परवडेल असे अन्न पदार्थ मिळतात पण ते नेहमीच घेणे शक्य नसते म्हणण्यापेक्षा खूपच खर्चिक ठरते. मग ग्रोसरी,भाजीपाळा,(येथे एक कोथिंबीर जुडी दोन डाॅलरला मिळते चिकन, मटण अशा एक ना अनेक बाबी आल्याच.

या शिवाय मित्रमंडळींबरोबर हाॅटेलिंग, विकएडंच्या पार्ट्या ,माॅल मधील खरेदी,ऑफिस मध्ये जाण्या येण्यासाठी रेल्वे किंवा बसचा मासिक पास अशी यादी बरीच मोठीच होईल. ह्या सर्वच अंदाजीत खर्चाची गोळाबेरीज दिड ते दोन लाखापर्यंत जात असते.पण ज्या अर्थी ते एव्हढा खर्च करू शकतात त्याचाच दुसरा भाग त्याची आर्थिक कमाई कॅनडीयन डाॅलर मध्ये असते हे लक्षात घ्यायला हवे!


कॅनडातील शासनाने प्रत्येक श्रमजीवी,शासकीय सेवेतील कर्मचारी,खाजगी, तसेच कार्पोरेट जगतातील, शैक्षणिक, वाहतूक क्षेत्रातील थोडक्यात सर्वाचेच वेतन किंवा त्यांनी दिलेल्या सेवेचा मोबदला ठरवून दिला आहे.( तसा प्रत्येक देशानीही ठरवून दिले असते पण खाजगीत फसवणूक होत असते)


आता महागाईच्या झळा कॅनडातही जाणवत आहेत. महागाई वाढत आहे. त्यामुळे खर्चाचा बजेट कोलमडतोय असा कोणी आक्रोश करीत नाहीत. खरे तर तेव्हढी फुरसत आहे कोणाला?

क्रमश:
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन