
मिसीसागातील जीवनशैली राहाणीमान आणि एका कुटुंबावर येणारा सरासरी खर्च (भाग 2)
मागील भागात फक्त कपल्सचा विचार केला, एक दोन मुले त्याचा शैक्षणिक, पालनपोषण, आणखीन कुटुंब मोठे असेल तर त्यांच्या गरजा मोठ्या आणि खर्चही तितकाच जास्त हे सुज्ञास सांगणे न लागे. असो. . .
आता माॅल संस्कृती जगभर प्रस्थापित झाली आहे आणि त्याचे नावीन्य भारतीयांनाही राहीलेले नाही फरक एवढाच आहे कि कॅडनातील व अमेरिकेतील माॅल हे कितीतरी पटीने भव्य, विशाल असतात. काही माॅल हे बांधकामाशी निगडीत असले तर त्या ठिकणी इती पासून ते सर्वच मटेरियल उपलब्ध असते. प्रत्येक विभागाची संगणकावर तेथे ठेवलेल्या वस्तुंची नोंद असते. इतकेच नव्हे तर तर समजा तुमच्या घराच्या भिंतीला रंग द्यावयाचा असेल तर त्या रंगाचा एक पापुद्रा दाखविलात तर तसाच रंग, शेडचा कलर मिळणारच.

येथील माॅल मध्ये शाॅपींग करणे हा फारच विलक्षण अनुभव आहे. येथील माॅल मध्ये भारतीयांची मॅनेजमेंट मधील संख्या लक्षणीय असते. हीच बाब ग्रोसरी किंवा अन्य हव्या त्या मटेरियलसाठी माॅल उपलब्ध असतात.

या मिसीसागात आठवडी बाजार भरतो त्याला फ्लि मार्केट असे म्हणतात. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांना लागणारे थंडीचे, गरमीचे, फाॅर्मल, तसेच बेडशीट, गाद्या, फर्निचर, जे काही हवे ते येथे एकाच ठिकाणी मिळते. घरपोच डिलिव्हरीची ही सोय असते. त्याच प्रमाणे भाजीपाळा, ग्रोसरी, फळे फुले, मच्छी, मटन जे जो वांछील ते या मार्केट मध्ये मिळते आणि तुलनात्मक थोडी स्वस्ताईही असते.
क्रमश: डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











