
*प्रगती फाउंडेशन आणि लोकमत यांच्या सौजन्याने IVY पुरस्कृत म्युझिक टॅलेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन, नव कलाकारांना मिळणार भव्य व्यासपीठ.*
उगवत्या नव कलाकारांना गायन, संगीत आणि नृत्य क्षेत्रात कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि म्युझिक अकॅडमीना सपोर्ट करण्याकरिता सदर म्युझिक टॅलेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी वाशी नवी मुंबईतील विष्णु दास भावे या सभागृहात करण्यात आले आहे.
IVY एन्टरटेन्मेंट प्रा ली या कंपनीच्या सामजिक दायित्व योजनेतून प्रगती फाउंडेशनच्या वतीने लोकमतच्या सहकार्यातून पार पडणार आहे.
गायन, संगीत आणि नृत्य या तीन प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे.
इच्छुक स्पर्धकांनी ऑनलाईन पद्धतीने ऑडिशन दिलं असून आयोजकांकडून तीनीही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत पंचांची नेमणूक करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रत्येक विभागात पाच टॉपच्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी आणि अंतिम विजेतेपद पटकावण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

गायन विभागात प्रसिद्ध कलाकार प्रसाद चव्हाण आणि सोनम अहिर, नृत्य विभागात प्रसिद्ध कलाकार, लावणी सम्राट अभिनेता अश्मित कामठे तसेच संगीत वाद्य (तबला वादक) विभागात प्रसिद्ध तबला वादक राजाराम शिवलंगण व रघुनाथ पाटील हे पंच म्हणून भुमिका पार पाडणार आहेत.

कार्यक्रमात आय टी ग्रुपचे उपाध्यक्ष प्रो आर एस एस मणी, प्रसिद्ध मराठी टी व्ही कलाकार अभिजित महाडिक, संस्थेचे अध्यक्ष किरण राणे आणि लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विभागात तीन विजेते कलाकार निवडले जाणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रसिद्ध बॉलिवूड फेम विनोदवीर प्रशांत राव करणार आहेत.

या दर्जेदार संगीतमय स्पर्धेचा आनंद मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मोफत प्रवेश तिकीट संस्थेच्या कार्यालयात आणि हॉलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक प्रेक्षकांनी मोफत प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी 9920980613 किंवा 9920480613 या क्रमांकावर संपर्क साधावा.











