
मुंबई -करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान ग्राहकांसाठी अॅमेझॉननं नवी सेवा सुरू केली आहे.
अॅमेझॉनकडून ‘अॅमेझॉन पे लेटर’ या सेवेची सुरूवात करण्यात आली. Amazon.in या संकेतस्थळावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना व्हर्च्युअल लाइन ऑफ क्रेडिट देण्यात येणार आहे.
याद्वारे खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पुढील महिन्यात किंवा ईएमआयद्वारे पैसे देता येऊ शकतील.
केवळ साईनअप प्रोसेस फॉलो केल्यानंतर ग्राहकांना इन्स्टंट क्रेडिट देण्यात येईल.
त्याचा वापर करून ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपडेही खरेदी करता येणार आहेत, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.











