
जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर त्यांच्या साठी चांगली बातमी आलेली आहे. मागील काही दिवसापासून चर्चा सुरु आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग देण्यात येणार आहे.
जर कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागु झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी भर पडेल. आता सुरु असलेल्या 7 व्या वेतन आयोगानुसार ( 7th pay Commission ) कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी नवीन वेतन 18000 रुपये आहे.
सध्या सातव्या वेतन आयोगानुसार मूळ पगार 18000 असली तरी जास्तीत जास्त मूळ पगार हा 58900 एवढा आहे. अशातच फिटमेंट फॅक्टर नुसार जुन्या बेसिक वर रिवाईज्ड बेसिक हे कैलकुलेट होते. वेतन आयोगाच्या रिपोर्ट नुसार फिटमेंट फॅक्टर हा महत्वाचा घटक आहे.
7th Pay Commission मध्ये फिटमेंट फॅक्टर ( Fitment Factor ) 2.57 टक्के ठेवण्यात आला आहे. याच आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार ही वाढवण्यात येईल. या आकडयांना पाहिले तर 7 व्या वेतन आयोगात सर्वात कमी हाईक मिळाले होते. आणि मूळ पगार हा 18000 करण्यात आला.
आता सांगण्यात येत आहे की 8व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 टक्यापर्यंत करण्यात येईल म्हणजेच नवीन कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 18 हजार वरून 26000 हजार रुपये होईल.











