
मुंबई: लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन (Pradeep Patwardhan Death) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी ०९ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.
मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकेने प्रेक्षकांना नेहमीच हसवलं.
अभिनेत्याचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील राहत्या घरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.











