
*शिकागोतील सर्वधर्म परिषद आणि स्वामी विवेकानंद*
अमेरिकेत 11सप्टेबंर 1893 साली आयोजित केलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या परिषदेत हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व भारतवर्षाचे महान सुपुत्र व अध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी भाग घेतला होता.
शिकागोतील ही सर्वधर्मसमभाव परिषद भारतीयांच्या दृष्टिने फार ऐतिहासिक व भावनात्मक आहे. आज या स्मारकाला भेट देण्याचे भाग्य मला मिळाले याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो.स्वामी विवेकानंद यांच्या प्रती शब्द सुमनांची आदरांजली अर्पण करतो.
स्वामींनी आपल्या भाषणाची सुरुवातच माझ्या अमेरिकेतील बंधु आणि भगिनींनो या शब्दापासून केली आणि सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला आणि या भाषणाची नोंद इतिहासात अजरामर झाली आहे.
या ऐतिहासिक भाषणातून त्यांनी जे विचार मांडलेत त्याबद्दल माहिती देत आहे. कारण त्यातला प्रत्येक शब्द आजही आपल्या भारतभूमीची आन मान शान वाढवितो.
ते म्हणाले अमेरिकेन बंधू आणि भगिनींनो तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझे स्वागत केलेत त्यांनी माझे हृदय उचबंळून आले आहे.जगातील सर्वात जुनी संत परपंरा आणि सर्वधर्माची भूमी असलेल्या भारतातर्फे धन्यवाद देतो.आभार मानतो.
सहिष्णुतेचा विचार हा पौर्वात्य देशांची जगाला देणगी आहे हे माझ्या आधीच्या वक्त्यांनी मांडला त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे.
मला गर्व आहे माझा जन्म अशा धर्मात झाला आहे कि ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सर्व धर्म सम भावाची शिकवण दिली.आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाही तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो.
मला गर्व आहे कि मी ज्या देशात राहातो त्या देशाने गाजंलेल्या लोकांना शरणता दिली आहे.ज्यु लोकांचा छळ झाला त्यांना देशातच नव्हेतर आमच्या हृदयात स्थान दिले.त्यांची धार्मिक स्थळे उध्वस्त केली त्यानंतर त्यांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला.
मला गर्व आहे कि मी अशा धर्मात जन्मलो आहे कि ज्याने पारशी धर्माच्या लोकांचं या देशात स्वागत केले आणि आजतागायत मदत करत आहेत. मला एक श्लोक सांगावासा वाटत आहे कि ज्या प्रमाणे नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावतात, वेगवेगळ्या मार्गाने जाऊनही त्या सागरास मिळतात त्याच प्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो आणि इस्रायलच्या पोहोचवतात हा माझा विश्वास आहे.
सांप्रदायिकता, कट्टरतावाद, आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या सुंदर भूमीला आपल्या पाशात अडकवून ठेवलं आहे यामुळेच धर्माच्या नावावर हिंसाचार होऊन देश आणि अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत.
हे सर्व भयंकर असूर नसते तर मानवी समुदायाची स्थिती कितीतरी चांगली असती.पण अशा लोकांची वेळ आता भरली आहे.या संमेलनामुळे अनेक चांगल्या गोष्टींना सुरुवात होईल. कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाविरोधात या सभेने रणशिंग फुकंले आहे.त्यामुळे लोकांचे दैन्य आणि दु:ख कमी होईल.
असे हे सर्वाचे अंतःकरणात साद घालून भाषण संपवून आभार मानून थांबले.पुन्हा सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला, कडकडाटात झाला नि हिंदु धर्माची महती जगभर प्रस्थापित झाली. शिकागोत येणारा भारतीय नागरिक या स्मारक स्थळास आर्वजून भेट देतो आणि तेथे नतमस्तक होतो. असे पवित्र ठिकाण भारतीयांच्या अस्मितेचा भाग झाला आहे. पुन्हा भारतमातेच्या महान सुपुत्रास मानाचा मुजरा आणि लाख लाख वंदन!
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











