सफर शिकागोची: शक्तीशाली अमेरिकेचे संविधान निर्मिती, उद्दिष्टे, तरतूदी आणि रचना – डॉ भास्कर धाटावकर – भाग 10

शक्तीशाली अमेरिकेचे संविधान……निर्मिती,उद्दिष्टे,तरतूदी आणि रचना

अमेरिकेतील संविधान पायाभूत कायदा यात अमेरिकेतील केंद्रातील सरकारची रचना ,कामकाज व अधिकाराची व्याख्या करण्यात आली आहे. 4 जुलै 1776 रोजी ब्रिटिश जोखडातून स्व:ताची सुटका करून आपले स्वातंत्र्य घोषित केले. सप्टेंबर 17इ.स.1787 मध्ये फिलाडेफ्लिया येथे भरलेल्या संविधान अधिवेशनात तेरा राज्यांनी एकत्रित येऊन नागरिकांच्या वतीने तयार केलेले संविधान स्विकारण्यात आले. हे संविधान अमंलात आल्यावर त्यात सत्तावीस वेळा बदल करण्यात आले यापैकी दहा बदलांना अमेरिकेन नागरिकांचा हक्कनामा असे संबोधतात.

सुप्रसिद्ध विचारवंत थॉमस पेनने दिलेल्या रूपरेषाचा आधार घेऊन हे संविधान तयार करण्यात आले आहे.

*लोकांचे,लोकांकरिता लोकांनी चालविलेले राज्य* असे सुटसुटीत स्वरूप ठेवण्यात आले.

अध्यक्षीय पध्दतीचा स्विकार करण्यात येऊन राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख असतील.राष्ट्रीय प्रशासकीय रचनेत संसद,अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा सत्तेचा समतोल राखतात.अध्यक्षाची निवडणूक दर चार वर्षांनी होते आणि फक्त दोनच टर्म निवडणूक लढविता येते.50 राज्यातील जनता अध्यक्ष निवडतात.

अमेरिकेतील संविधानाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व सामान्य जनतेचे हित समोर ठेवून ईश्वर, दैवी आशीर्वाद, धर्म, धर्मगुरू,राजा यांना टाळण्यात येऊन थॉमस पेनच्या विचारधारेचा आधार घेऊन हे संविधान तयार करण्यात आले आहे. कायदे बनविण्याचा सार्वभौम असलेल्या काँग्रेस कडे असून त्यांच्या मान्यतेनुसार ते अध्यक्षांकडे स्वाक्षरी साठी जाते.लोकप्रतिनिधी सदस्य दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या राज्यातून निवडले जातात. सिनेट सदस्यांना त्यांच्या कामासाठी मानधन दिले जाते.काँग्रेस कडे नवा कर ,कर्ज उभारणे ,अंतर्गत शांतता राखणे त्यासाठी वेळ पडली तर लष्कराला पाचारण करणे असे महत्त्वाचे अधिकार आहेत.

अशा प्रकारे अमेरिकेचा राज्यशकट चालू आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन