स्वयमसेवी संस्था प्रगती फौंडेशन आणि विमल फौडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने नवी मुंबईत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि माजी पालक मंत्री गणेश नाईक यांची शिबिरात उपस्थिती

सत्तराव्या भारतीय प्रजास्ताक दीनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी नवी मुंबई जुईनगर गावदेवी समाज मंदीर हा‍ल येथे प्रगती फौंडेशन आणि विमल फौडेशन यांच्या सयुंक्त विध्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला आय. टी. एम. हेल्थ सायंस, न्यु मिलेनियम होस्पिटल, स्वराशी नेत्रालय, वाय. एम. टी. डेंटल, दोस्त नवी मुंबई आणि अनविश्का ब्लड बंक यांचे सहकार्य लाभले.

सदर आरोग्य शिबिरात विविध आरोग्य विषयी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आलया होत्या. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी व चाचण्या तसेच नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा , रक्त दाब तपासणी , रक्त गट तपासणी , आर.बी.सी. , सी.बी.सी. , बी. एम. डी. , बी.एम.आय. आणि ई.सी.जी. तपासण्या इत्यादीचा समावेश होता. त्याचप्रमाणे गरजू व ज्येष्ठ नागरीकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

प्रगती फाऊंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून संस्थेच्या स्थापनेपासून सामाजिक,आरोग्य,आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध वंचित समुहांच्या सक्षमिकरणासाठी कार्यक्रम राबवित आहे . तसेच विमल फाऊंडेशन ही सहयोगी संस्था नवी मुम्बईत वंचीतांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.

नवी मुम्बईचे महापौर श्री.जयवंत सुतार आणि स्थानिक नगरसेविका तनुजा मढवी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महापौर श्री सुतार यांनी शिबिरातील प्रत्येक विभागाला भेट देवून उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. तसेच शिबिरात आलेल्या नागरिकांशी सवांद साधून शिबिराच्या उपयुक्तते विषयी त्यांची मते जाणुन घेतले.

नवी मुम्बईचे माजी पालक मंत्री गणेशजी नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदिप नाईक,आणि माजी महापौर यांनीही शिबिरात उपस्थित राहून महाआरोग्य शिबिरात उपलब्ध असलेल्या सेवेविषयी माहीती घेतली. गणेश नाईक यांनी शिबिरात उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्य विषयी मागर्गदर्शन केले. सध्या प्रचलित असलेल्या खाण्याच्या सवयी आणि जंक फूड यामुळे आरोग्यावर होणा‌र्या दुषपरीणामांविषयी भाष्य केले. तसेच मानवाने आधुनिक युगात अंग मेहनत टाळून प्रत्येक कामासाठी यंत्राची मदत घेण्यास सुरुवात केली आणि अनेक रोगाना आमंत्रण दिले आहे असे त्यांनी सांगितले. सदर प्रसगी नाईक यांनी पर्यावरण सरंक्षणासाठी तसेच सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी येत्या महीन्यात नवी मुबईमधे  सायकल रँली आयोजित करीत असल्याचे घोषित केले. तरूण वयातच होत असलेल्या ह्रुदयविकाराच्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी आरोग्य शिबिरात ई.सी.जी. तपासणी नागरीकाना मोफत उपलब्ध करून दिल्याने दोन्ही संस्थाचे आभार मानून कौतुक केले आणि भविष्यातही अशाचप्रकारे चांगले कार्य करत राह्ण्याचा शुभेछा दिल्या.

जवळपास चारशे लोकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि आपलया आरोग्यविषयीच्या समस्यांचे समाधन करून घेतले. विभागातील महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरीकानी शिबिरात लक्षवेधी उपस्थिति दर्शवली होती. एक्शेवीस लोकांना संस्थेमार्फत मोफत चष्मे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पन्नास दात्यानी रक्तदान व अवयव दान करून प्रजासत्ताक दिनी आगळी वेगळी देश सेवा केली. समाजसेवक श्रीधर मढवी, सौ. माधुरी सुतार, विजय साळे, अण्णा पाटील, बबन पाटील, हनुमंत रोडे, सुरेश पाटील, नंदा भोप, सारीका भोईर, शैलैष भोईर, हनुमंत पाटील, सुर्याकांत गोडसे , अक्षय भोसले, अनिथा नायडू, ह्रिषिकेश म्हात्रे, निरज घाग, मनोहर शिंगाटे, करिष्मा म्हापल्कर, शुभदा पाटणकर, चिन्मय चव्हाण, राकेश वाणी, सौ. सिद्धि राणे, आकाश ढसाळ,प्रकाश ढसाळ आणि किरण राणे आदी मान्यवर शिबिरात उपस्थित होते.