
राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक अभिलेखाचे महत्त्व
डॉ भास्कर धाटावकर हे नाव सर्व वाचक वर्गाला सुपरिचित झालेलं आहे. डॉ धाटावकर हे जसे उत्तम लेखक आहेत तसेच ते उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून देखील परिचित होते. डाॅ.भास्कर धाटावकर हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालय मुंबई कार्यालयात अनेक वर्षे पुराभिलेख संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ भास्कर धाटावकर यांनी अनेक विषयांवर लिखाण केले आहे. सर्व सामान्य जनतेला राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक अभिलेखाचे महत्त्व समजावे तसेच ऐतिहासिक दस्तावेज यांची माहिती देण्याकरीता सदर लेखमाला लिहीत आहेत. . .
अभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी कागदपत्रे. मानवाला त्याच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद कागदपत्रांद्वारेच करावी लागते. पुरावा म्हणून, संदर्भा करीता ती जपून ठेवावी लागतात. आता पुराभिलेख विभाग म्हणजे काय हे सर्व प्रथम आपण समजून घेऊ. पुरा म्हणजे जुने. अभिलेख म्हणजे कागदपत्रे. ज्याठिकाणी जुनी कागदपत्रे जतन केलेली, सांभाळून ठेवलेली असतात त्या ठिकाणाला “पुराभिलेख विभाग” असे संबोधतात.
ज्याला आपण सरसकट रेकॉर्ड म्हणतो हा शब्द लॅटिन भाषेतील असून त्याचा अर्थ स्मरण असा आहे. प्राचीन काळापासून लेखन कला अवगत नव्हती तेव्हा आपल्या पूर्वजानी आपले विचार एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे पाठांतर करून सुपूर्द केला.पुढे उत्तर सूत्र काळात लेखन कला अवगत झाल्यानंतर चिन्हे, चित्रकला, कोरीव शिल्पे, पशुपक्षी कातड्यावर , शिलालेखावर, त्यापुढेही ताम्रपटावर तो लिहीत राहिला.
इ.स.1302 मध्ये जगातील पहिला अभिलेखाधिकारी इटलीतील बोलगाणा येथे झाली. तेथून इंग्लंड मध्ये आणि एडवर्ड फर्स्ट यानी राणी एलिझाबेथ हिच्या कारकीर्दीत 1578 साली ” स्टेट पेपर ऑफिसची स्थापना केली.
बौद्ध कालीन रेकॉर्डची सुरुवात जातकस याच्यापासून होते. कौटिल्याचा अर्थशास्त्र राजदरबाराच्या सुरक्षेविषयी दिलेले जे सांभाळून ठेवले तेथूनच भारतीय लेखागाराची सुरुवात मानली जाते.
कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामधून तत्कालीन प्रशासकीय व्यवस्थेत पुराभिलेखारे कशा प्रकारे जतन करून ठेवली होती, अभिलेख व्यवस्थापन कशा प्रकारे विकसित केले होते याची सविस्तर माहिती या ग्रंथाची जी प्रस्तावना लिहीली आहे तिच्या पृष्ठ क्रमांक नऊ आणि दहावर उपयुक्त माहीती दिलेली आहे.
दक्षिण भारतात चोळा राजवटीत well organised record offices for their palm letters record or the òlaias they were called. अलिकडेच रिलीज झालेला मणीरत्नम यांचा पी.एस पार्ट.वन आणि पी.एस.पार्ट दोन मध्ये पाल्म पृष्ठाची पत्रे दाखविण्यात आली आहेत तर केरळमधील पुराभिलेख विभागात अशा प्रकाराची अस्सल,अव्वल पाल्मपत्रे जतन करून ठेवली आहेत.
मध्ययुगीन काळातील शुक्रमिती हा सुप्रसिद्ध ग्रंथातून आपणांस अभिलेखागाराविषयी मनोरंजक माहीती मिळते. writing was created by Brahma as a reminder of the past time the modern defination is that ” a document is a memory of the past events. According to the Sukraniti no business of the state was done without a written document
1442 मध्ये अबदूर रजाक यांनी विजयनगरला भेट त्यांस चिहालसुनन या चाळीसखांबाच्या हाॅल मधील अत्यंत प्रशस्त जागेत सुव्यवस्थित रित्या अभिलेख जतन करून ठेवलेले आढळून आले होते.त्या अभिलेखागाराचे वर्णन अबदूर याने सुंदररित्या केलेले आहे. ते मुळातूनच वाचायलाच पाहिजे . कारण राज्य शकट चालविताना एखाद्या प्रकरणाची सत्यसत्यता समजून घेण्याकरीता ही कागदपत्रे अभ्यासून त्यातील वस्तुनिष्ठ इतिहास समजून, तपासून त्या घटनेच्या समकालीन कागदपत्रांतील तारतम्य पाहूनच घडलेल्या घटनेवर वस्तुनिष्ठ कोणतेही अभिनिवेश न धरता त्याचे शब्दांकन केले पाहिजे.
केलादी राज्यामध्ये पीटर मुंडीनेही एक्केरी येथे 1667 साली भेट दिली असता तेथील रेकॉर्ड रूम पाहिल्यावर त्यांनी लिहून ठेवलंय कि सर्वच महत्त्वाचे पाल्मपत्रावरील अभिलेख व्यवस्थित प्रकारे ठेवलेले आहेत. या अभिलेखागारांसाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत बांधण्यात आली होती.
अकबराने आपली राजधानी फत्तेपूर सिक्री येथे 1574 मध्ये वसविली. यावेळी अबुल फझल याच्या सल्याने आणि मार्गदर्शनाप्रमाणे अकबराच्या निवासस्थानाजवळच खास अभिलेखागारासाठी एक 48 फूट लांब 28 फूट रूंद अशी भव्य इमारत बांधण्यात आली होती . आजही फत्तेपूर सिक्री येथील ही ऐतिहासिक वास्तु त्याची साक्ष देत दिमाखात उभी आहे. बादशहा किंवा राजांच्या निवासस्थाना जवळच अभिलेखागाराची इमारत बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे न्याय निवाडे करताना त्वरित रेकॉर्ड उपलब्ध व्हावेत आणि अत्यंत सुरक्षित राहावेत हा उद्देश असायचा. या अभिलेखारांचा प्रमुख हा विश्वासातील अधिकारी असे.
सन 1640 साली संबस्टीन मनदिक या परदेशी प्रवाशानी या दप्तरखान्याविषयी लिहून ठेवलंय कि ” कोर्टाच्या समोरच्या प्रासादात सर्वाधिकारी बादशहा राहात असून त्याचे फतवे, सनदा, पत्राचे तर्जुमे ठेवण्यात आले आहेत.
अकबराच्या रोजच्या दरबारातील, कोर्टातील आदेश लिहून ठेवण्याचे आदेशच देण्यात आले होते तसेच बादशाहाने वेळोवेळी दिलेले हुकूमांची नोंद केली जात असे यातूनच अकबरनामा या ग्रंथाची निर्मिती झाली.
Ain–I– Akbari: ” Keeping record is an excellent thing for a Government.
अर्थशास्त्र आणि शुक्रमिती ह्या दोन्ही ग्रंथामधून अभिलेखालेखांचे महत्त्व आणि ते जतन करून ठेवण्याबाबतच्या स्पष्ट संकल्पनाची आपणास माहीती मिळते. ” अक्षापाताळा ” वरून हिंदुच्या राजवटीतील अभिलेखांचे जतन, संरक्षण कशा प्रकारे केले जात होते याची माहीती मिळते. मोगल संस्थापक बाबरच्या बाबरनामा मधून, हुमायूनच्या हुमायूनामातून तत्कालीन सामाजिक स्थितीचे, राजकीय घडामोडींचे आकलन होते.
जहांगीर, त्यानंतर शहाजहान यांनीही दैनंदिन घडामोडींवरील नोंदी ठेवल्या आहेत. ताजमहालच्या निर्मिती संदर्भातील सुरुवातीपासून ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतरचे सर्व दस्तावेज यात वास्तुविशारदचे नकाशे, प्रमुख वास्तुविशारद, खर्चाचे तपशील वीसएक वर्षाचे बारीक सारीक नोंदी पटियाला पुराभिलेखागारात सुरक्षित ठेवण्यात आला आहे आणि मौल्यवान दस्तावेज मी स्वता: या लेखागारांस भेट देऊन त्याचे अवलोकन केले आहे.
औरंगजेबनीही आपल्या पदरी इतिहास लिहीणारे अनेकजण ठेवले होते त्यातील खाफीखान चांगलाच प्रसिद्ध आहे. औरंगजेबचा आलमगिरनाम्यातून त्याच्या राजकीय कारकीर्दीची माहीती मिळते.
मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना आग्राभेटीचा आग्रह धरल्यावर महाराजांनी आश्रयास भेट दिली त्यावेळेस मिर्झाराजेच्या वकीलाने रोजच 12 मे 1666 ते 15ऑगस्ट 1666 पर्यन्तचे लिहिलेले वकील रिपोर्ट राजस्थान राज्याच्या बिकानेर येथील पुराभिलेखागारात ठेवण्यात आले आहेत ते मी स्वता: जाऊन त्या रिपोर्टाच्या प्रती मुंबई पुराभिलेखागारात आणून ठेवल्या आहेत.
हिंदुस्थानात मोगलांची सत्ता स्थापन झाल्यानंतर फारसी भाषेचा राजकारभारात प्रवेश झाला. विजेता आपली भाषाच ज्यांना जिंकून घेतले आहे त्यावर लादत असतो. या मोगलांनी आपला दप्तरखाना बगदादच्या खलीफाच्या धर्तीवर आखले होते यामध्ये फारसी फर्माने, कौल , महजर, तवारिका, वृते, व इतर इतिहासाच्या नोंदी यांचा विशेष भरणा असल्यामुळेच ती इतिहासाची अव्वल साधने म्हणून उपयुक्त असतात.
आता शून्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जगतात नावलौकिक कमविण्यात अग्रेसर असणाऱ्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजीमहाराज यांचा दप्तरखान्या विषयी काय ह्यष्टीकोन होता याची माहीती आपण घेऊ या. कारण ते कितीतरी प्रेरणादायक, उद्बबोधक असेच आहे त्याची माहीती जाणून घेऊ.
शिवप्रभुंनी आपली अंतिम राजधानी रायगड किल्ल्यावर निश्चित केल्यानंतर मुख्य वास्तुविशारद इंदुलकर करवी स्वराज्याला आवश्यक असणाऱ्यां इमारती, राजदरबार, भव्य बाजार पेठ, राणीवसा व स्वताःसाठी भव्य प्रासाद आणि त्याच्या जवळच दप्तरखान्यासाठी देखणी टुमदार इमारत बांधण्यात आली होती. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष हत्येनंतर झुल्फीकार खानानी हा स्वराज्याचा दप्तरखाना 1689 मध्ये जाळून नष्ट केला.
आजकाल इतिहास विषयाची आपल्याकडे उपेक्षाच केली जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी जो राष्ट्र आपला इतिहास विसरतो त्यांचा भवितव्य अंधारमय असतो. इतिहासात घडलेल्या लक्षात घेऊनच त्याची पुनरावृती होऊ न देता योग्य तो धडा घेऊनच पुढील झेप ही घ्यायची असते.
मुंबई पुराभिलेखागारात अव्वल ब्रिटिश कालीन इ. स.1630 पासूनचा रेकॉर्ड असून त्याला सुरत फॅक्टरी रेकॉर्ड असे संबोधतात.
मुंबई पुराभिलेखागारात देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील सर्वच कागदपत्रे उपलब्ध आहेत. या मध्ये महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जडणघडणीतील असा कोणताही विषय असू शकणार नाही की ज्याची माहीती या मुंबईच्या अभिलेखागारात सापडू शकणार नाही. ब्रिटिशांनी केलेले सत्ता संपादन त्यांच्या लष्करी हालचाली, दळणवळण, पाणी पुरवठा, नागरी व्यवस्थापन, उद्योगधंदे, बंदराचा विकास, शिक्षण, सामाजिक आरोग्य, रस्ते, धरणांची निर्मीती, शेतीविषयक सुधारणा असे जीवनाचे सर्व विषय व्यापून टाकणारे अभिलेख याठिकाणी सामावलेले आहेत ते इतिहास संशोधकांच्या प्रतिक्षेत आहेत.
पुणे पुराभिलेखागारास पेशवे दप्तर या नावाने पुर्वी ओळखले जात असे. येथे 1590 पासूनचे शहाजी राजे इतिहासा संबधी अभिलेख आहेत. विशेष म्हणजे एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीतील, आणि एका राज्याचा इतिहास सांगणारी व अटकेपार मराठ्याचां भगवा फडकवणारे मराठ्यांचा इतिहासाचा महापराक्रम सांगणारे चार कोटी मोडीलिपीतील कागद पत्रे येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने आता 1971 मध्ये औरंगाबाद व नागपूर येथे मराठवाडा आणि विदर्भ साठी प्रादेशिक समतोल राखण्यासाठी व याविभागातील ऐतिहासिक कागदपत्रांचा शास्त्र शुध्द पध्यतीने सांभाळ करण्याकरीता आता छत्रपती संभाजीनगर येथे अभिलेख कार्यालये स्थापन केली.
औरंगाबाद येथे फारसी भाषेतील सर्वच दस्तावेज एकत्रित ठेवण्याचा निर्णय मी घेतला आणि येथे शासनाची परवानगि घेऊन व फारसी वाचकची पोस्ट मंजूर करून घेतली व एकूण 1395 फारसी दस्तावेज ठेवण्यात आले आहेत. येथे सर्वात जुने फारसी दस्तावेज 1397 सालातील अभिलेख आहे. हा आपल्या देशातील दुसर्या क्रमांकाचा दस्तावेज आहे. सर्वात जुना अभिलेख राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली मध्ये 1348 वर्षातील आहे. सदर अभिलेख फारसी रूमाल एक मध्ये ठेवण्यात आला असून हा महजरनामा आहे. तत्कालीन समाजजीवनावर आणि कायदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रकाश टाकणारा असल्याने वाचकांच्या माहीती साठी तो मुद्दामहून देत आहे.
बिदरचा बादशाहा महम्मद दुसरा हा वरल कडून बिदर कडे जात असताना त्याचा मुक्काम केम परांडा येथे झाला.त्याच्या छावणीची सुरक्षा व्यवस्था गावचा कुळकर्णी वामनाजी जोशी याच्याकडे होती पण त्यानी कर्तव्य नीट पार पाडले नाही आणि नेमकी बादशाहाच्या बेगमेचीच चोरी झाली. त्यानंतर वामनाजी जोशीला जबाबदार धरून अटक करून बिदरला नेण्यात आले. व चौकशीअंती 1101 होन एव्हढा दंड ठोठावला. दंड न भरल्यास मृत्युदंडाची शिक्षा कायम करण्यात आली.
वामनाजी दयेची भिक मागत होता. शेवटी बालाजी जनार्दन या मनसबदारानी दंडाची रक्कम भरून वामनाजी सुटका केली. याबदल्यात जनार्दन यांनी भूमपरांडा येथील वतनाचे खरेदी खत लिहून घेतले. त्यासंदर्भातील हा महजर नामा आहे.यात कानोंगो परिसरातील कानांना, देशमुख, पाटील, बलुतेदार, अलुतेदार, यांच्या साक्षीने हा महजर नामा परांडा किल्ल्यात लिहीला आहे.यातील एक साक्षीदार बोलतो ” आम्ही तर चुलीत जाळण्याची लाकडे, पुढून काय आणि मागून काय? आम्हास जळावयाचेच आहे. या साक्षीदाराराकडून हवे वदवून घेण्यात येत असतानाचे त्याचे शब्द आहेत.
या कागदपत्रांमध्ये औरंगजेबनी दिलेल्या अभयपत्रावर त्याच्या दोन्ही पंजाचे ठसे उमटविलेले आहेत. येथे अनेक इतिहास संशोधक ही फारसी कागदपत्रे अभ्यासासाठी येत असतात.
विदर्भकरीता नागपूर येथे विभागीय पुराभिलेखागाराची निर्मिती महाराष्ट्र शासनाने केली.नागपूर कार्यालयात 1932 पासूनचे असेंब्ली डिबेट तसेच रघोजी भोसले घराण्याचे ऐतिहासिक दस्तावेज तसेच अमरावतीचे खापर्डे यांच्याकडून मिळालेला दप्तर ठेवण्यात आले आहे.
मुंबई पुराभिलेखागार हा आशियाई खंडातील सर्वात मोठा दप्तरखाना असून त्यामध्ये एकूण 46 देशाचा इतिहास सांगणारी अस्सल कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत इतकेच नव्हेतर या अभिलेखाची सुची करून ती प्रकाशित केली असून संशोधकाच्या मागणीनुसार त्यांना अभिलेखाच्या सी.डी.उपलब्ध करून दिल्या जातात. या मुंबई पुराभिलेखागारास प्रदेशातील अनेक संशोधक, इतिहासकार, लेखक भेट देत असतात. हे एक ज्ञान दानाचे प्रमुख केंद्र झाले आहे.
राष्ट्रीय जीवनात अभिलेखाचे महत्त्व आहे. कारण इतिहास लिहिताना ऐतिहासिक साधने फार महत्त्वाची असतात. No documents No History हे इतिहास लिहिताना मूलभूत तत्वाचे पालन करणे अत्यंत जरुरीचे असते. वस्तुनिष्ठ इतिहास त्याशिवाय लिहीता येत नाही.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
मोबाईल : 835 595 7451












