
मुंबई पुराभिलेखागारातील वृत्तपत्रांचा असलेला अमोल असा दुर्मीळ खजिना
मुंबई पुराभिलेखागारात असलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक अस्सल दस्तावेजाची माहिती घेतली आहेच.आता या आशियातील खंडातील अभिलेखांच्या ह्यष्टीकोनातून महत्व असलेल्या दप्तरखान्यात किती जुनी, दुर्मीळ वृत्तपत्रांचा खजिना संरक्षण करून ठेवण्यात आला आहे त्याची माहिती करून घेऊ या.
येथे सर्वात जुने वृत्तपत्र म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल त्यांत 1797‐- 1846 पर्यन्त प्रकाशित झालेल्या बाॅम्बे कोरिअरचे सर्व अंक येथे जतन करून ठेवले आहेत.
1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्राचे जनक यांनी सुरू केलेला दर्पणचे अंक येथे ठेवण्यात आले आहेत.

1831 मधील बाॅम्बे नेटीव्ह ऑब्झव्हर, अशा तत्कालीन ब्रिटिश कालीन वृत्तपत्रांचा भरणा येथे आहे.त्यांची यादी खूपच मोठी आहे.

महात्म्या गांधीनी 1942 मध्ये सुरू केलेला हरिजन या वृत्तपत्रांचाही समावेश आहे.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या पहिल्या अंकापासून ते आजतागायतचे अंक तसेच महाराष्ट्र टाईम्सच्या सुरुवातीपा सून ते आजपर्यंत प्रकाशित आजतागायत अंक येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत त्यांच्या मदतीने अनेक स्काॅलर लोकांनी आपले ग्रंथ निर्माण केले आहेत.

लोकमान्य टिळकांचे केसरी‐ मराठाचे, आगरकरांचे सुधाकरचे अंक येथे विराजमान आहेत.

या सर्व वृत्तपत्रांच्या आधारे कित्येक लेखक, इतिहासकारांनी स्वातंत्र्य चळवळीतीचा इतिहास शब्दबद्ध केलेला आहे.
असे हे 1797 पासूनची वृत्तपत्रे आपल्यासाठी अस्सल सत्य स्पष्ट करून सांगण्यास तत्पर आहेत. एकदा भेट देऊन तर पहा.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451












