कांगारूंच्या देशात: डॉ. भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून सफर ऑस्ट्रेलियाची – भाग 9

आज टूरचा शेवटचा दिवस. आज सकाळी वेकअप काॅल आला. ब्रेकफास्ट करुनच हाॅटेलमधून चेकआऊट करावयाचे होते. तेथूनच सिडनीतील जगप्रसिद्ध ऑपेरा हाऊसला भेट द्यायचीही होती. या भेटीनंतर आम्ही लंच घेऊन सिडनी विमानतळावर जाणार होतो. आमच्या बॅगा बसमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

आज टूरची सांगता होणार याची हुरहुर लागून राहिली होती. फारच थोड्या कालावधीत आम्हां टूरवरील सर्वच सदस्यांची मने जुळून आली होती आणि आजच मुंबईतील परतीचा प्रवास सुरू होणार होता. वीणा वर्ल्डच्या टिम व्यवस्थापकानी आमच्या ग्रुपचा एकत्रित फोटो काढण्याचा कार्यक्रम ब्रेकफास्ट नतंर उरकून घेतला होता. आज चर्चेचे खास असे विषयही नव्हते. फक्त जाता जाता काही तरी शेवटल्या दिवशीही साईटसिंईग ठेवण्याची बहुतेक टूरीस्ट व्यवस्थापन ठेवत असावेत.

आज आम्हांल सिडनीतील सर्वाधिक लोकप्रिय असे हे ठिकाण जे ऑपेरा हाऊस आहे तेथे नेण्यात आले. या ऑपेरा हाऊस विषयी त्याच्या निर्मीतीची माहिती अगोदरच सुरुवातीस दिली आहे. आता प्रत्यक्ष या ठिकाणी भेट दिल्यानंतर आलेला अनुभव तुमच्या बरोबर शेअर करीत आहे.या ऑपेरा हाऊसचे बांधकाम मार्च 1959 ला सुरू झाले आणि 1973 साली सर्वासाठी ओपन करण्यात आले. जगातील मोजक्याच वास्तुत जिचा समावेश होतो त्यापैकीच ही एक वास्तु आहे.

Opera House Sydney Australia

ज्या अमेरिकन वास्तुविशारद यांनी या ऑपेरा हाऊसची डिझाईन तयार केली त्याचे काम संपता संपत नव्हते’ खर्च मात्र वाढतच होता त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने त्याच्याकडून या प्रकल्पाचे काम काढून घेऊन त्याला अपमानित करून ऑस्ट्रेलिया बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हा मानभावी वास्तुविशारद पुन्हा ऑस्ट्रेलियात कधीच आला नाही. मात्र त्याच्या मुलाने ऑस्ट्रेलियाची विनंती मान्य करून हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत केली.

आमची सुरक्षा यंत्रणेकडून कडक तपासणी झाल्यानंतर तेथील अधिकृत गाईडनी अत्यंत बारकाईने तपशीलवार माहिती दिली. त्यात मुख्य थिएटरला समावेश होता . साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना, स्टेजवरील रचना इत्यादींची माहिती देऊन निर्मितीची चित्रफित दाखविण्यात आली . आमच्या सुदैवाने दुसर्‍या एका हाॅल मध्ये लाईव्ह संगीताचे कार्यक्रम पहावयास मिळाला . येथे आपली कला सादर करणे हेच प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते .

शेवटी ऑस्ट्रेलियन गाईडने आम्हांस सांगितले आजच्या बाजारमूल्य या ऑपेरा हाऊस निर्माण करण्याचा खर्च सांगायचे झाल्यास ते वीस लाख बिलियन डॉलर्स एव्हढा होईल. त्यानंतर आम्ही वैयक्तिक आणि ग्रुप फोटोग्राफी करून या जगप्रसिद्ध वास्तुचा निरोप घेतला.

Sydney Harbour Bridge

त्यानंतर हार्बर ब्रीज सर्कलला पुन्हा धावती भेट दिली. या हार्बर ब्रिज विषयी थोडी माहिती सांगावीसी वाटत आहे. या सेतु रून प्रचंड वाहतूक होत असते . जेव्हा अधिकची ट्रॅफिक वाढते तेव्हा अधिक लेन वाढविण्यात येतात. दुसर्‍या बाजूस रेल्वेची वाहतूक चालू असते. पण कधीच वाहतूकीची कोंडी होऊन देत नाहीत.

या शहरातून फिरताना व्हिक्टरोरियन शैलीतील ग्राॅथिक इमारती पाहाताना डोळ्यांचे पारणे फिटतात.किती कल्पकतेने हे शहर नमविले आहे याचे वर्णन मी करू शकत नाही. यासाठी अशा धावत्या भेटीतून नाहीतर सावकाशीने अवलोकन करायला पाहिजे.

हा प्रवास यथावकाश त्या विमान एअरवेजच्या शेड्युल प्रमाणेच संपला. विमानतळावर उतरल्यावर काहीनी सोबतची शिल्लक रक्कम त्यांच्या आवडीनुसार खरेदी करून समाधानाची तृप्ती प्राप्त केली. बाहेर आमचे नातेवाईक आम्हास घ्यायला आले होते. चेतनही आम्हांस घेण्यासाठी आला होता.

आमचे श्रीलंकन एअरवेजचे विमान मुबंई विमानतळावर रात्रौ दोनवाजता उतरले . आम्ही आवश्यक त्या फाॅरमालिटीज पुर्ण करुन बाहेर आलो. आमचे नातेवाईक प्रत्येकजण हात हलवून स्वागत करीत होते. कांगांरूच्या देशांतील धावती टूर संपली होती. माझ्या मनानी त्याचे वृत्तांकन केव्हाच सुरू केले होते इतकेच नव्हेतर त्यांचे टिपण काढून ठेवले होते. अनेकांचे पत्ते, मोबाईल नंबर घेऊन ठेवले होते यातील काही सहप्रवासी कायमचे लक्षात राहीले आहेत. त्या सहप्रवाशांची ओळख करुन या लेखमालेची सांगता करणार आहे.