
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, दोन दिसांची गमंत जमत…
या ऑस्ट्रेलियन टूरमध्ये डाॅक्टरांची अधिक संख्या होती. त्यात कोल्हापूरचे निष्णात आर्थोपेडीक डाॅ.राजेंद्र अंभ्यकर आणि त्यांच्या पत्नी डाॅ.भारती. कोल्हापूरला माझे विभागीय ऑफिस असल्याने तेथील अनेक इतिहासकारांशी माझा वैयक्तिक परिचय होता. शिवाजी विद्यापीठात सतत जाणे होत असल्याने माझा अनेकांशी घनिष्ठ संबंध.
डाॅ.अभ्यंकराना इतिहासाची आवड आणि त्यांचे वाचनही विपुल त्यामुळे आमची मैत्री लगेचच जमून आली. टूरमध्ये जेव्हा संधी मिळे तेव्हा आमच्या गप्पा रंगात येत होत्या.
कोकणातील वालावलकर संस्थेत कार्यरत असलेले डाॅ. दिपक शुक्ला आणि डाॅ. सुनीता झुंजारवाड हे सुध्दा या टूरमधील लक्षणीय व्यक्तिमत्त्व! डाॅ. सुनीता झुंजारवाड या तेथील रक्तपेढीची जबाबदारी सांभाळत आहेत. त्याच टूरच्या सिनीअर सिटीजन, त्यानंतर माझा नंबर होता. त्यांचा उत्साह खूप दांडगा होता.
डाॅ. शानूका आणि शकील कारोवालिया हे जोगेश्वरीचे तरूण जोडपे सर्वांनाच मदत करीत होते. दोघेही प्रथितयश डेंटिस्ट. कोणाची अडचण लक्षात आली कि ते लागलीच विचारपूस करून समस्या दूर करीत.
श्री मोहनदास मेनन आणि त्यांच्या मिसेस देवी मेनन केरळातून तर बडोदरा, गुजरातहून भद्रेशकुमार शाह आणि त्यांच्या पत्नी राजुलाबेन, परेशकुमार शहा आणि हेतलबेन ही चौकडी नेहमीच दणक्यात बसमध्ये जोरजोरात चर्चा करीत. अंताक्षरीत भाग घेत.
श्री भारतकुमार आणि त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट पत्नी मिसेस फाल्गुनी त्रिवेदी हे अभ्यासू जोडपे. त्रिवेदी युनियन बँकेतून निवृत्त झालेले तर त्यांच्या पत्नीस एकूण सात भाषा अवगत होत्या. शालेय शिक्षण गिरगावातील. मैत्रिणी मराठी भाषिक. त्यामुळे मराठीतून लिखाण, वाचनही उत्तमरित्या करीत.
दिल्लीतील शिक्षिका गुलशन राणी आणि त्यांच्याबरोबर रूम शेअर करणार्यां डेप्युटी शिक्षणाधिकारी माधवी शर्मा मॅडम यांच्याशी शैक्षणिक बाबींवर अगदी पोट तिडीकेने चर्चा होई.
बंगळुरू मधील जॉर्ज आणि त्यांची हसतमुख पत्नी शीला मुळचे बंगळूर मधील आता नवीमुबंईत नोकरीत. नेहमीच गप्पागोष्टीत सहभागी होत असत. ते मितभाषी होते. तसेच बंगळूरातील आणखीन एक मायलेकी नम्रता आणि अनया सॅलियन आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या होत्या. प्रत्येकजण दुसर्यास मदत होईल असेच पाहत होते.
ठाण्यातील प्राध्यापिका प्रमिला दळवी आणि त्यांची कन्या संज्ञा दळवी या अतिशय सुरेख आवाजात गाणे गात असत. गाण्यावरील त्यांची कमांड लगेचच सर्वांच्या लक्षात आली. अतिशय मनमोकळ्या स्वभावाच्या मायलेकी सतत मदतीचा हात पुढे करीत आणि अवांतर गप्पातही सहभागी होत.
शेवटी आमच्या ग्रुपमधील वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे चेंबूरची तिघांची सरदारजी फॅमिली होय. परमजीत सिंग, परमजीत कौर आणि त्यांची मुलगी जसमीन कौर ह्या जिंदादिल फॅमिलीकडून सर्वांनाच भरपूर चांगला प्रतिसाद मिळत होता. ते सर्व सदस्यांबरोबर हसून खेळून वागत होते. परमजीत सिंग स्वभावाने मदतीचा हात सदैव पुढे करणारे होते. आमच्या ग्रुप मध्ये चांगलेच परिचित झाले होते.
आता एव्हढ्या सदस्यांबरोबर आम्ही उभयता उषा धाटावकर, निवृत्त डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि मी
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक महाराष्ट्र शासन असे सत्तावीस सदस्य या टूरमध्ये सहभागी झालो होतो.
टूर व्यवस्थापक साईनाथ बराडे सर्वांचीच आपले कुटुंबिय म्हणून अत्यंत काळजीपूर्वक काय हवे नको विचारणा करून लागलीच मदत करत होते. त्यांनी कधीच कंटाळा केला नाही. सिनीअर सिटीजन्सना खूप मदत केली. त्यांनी स्थानिक स्थळांची माहितीही छान दिली. त्यामुळेच या ट्रीपचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख
संचालक, महाराष्ट्र शासन.
मोबाईल 835 595 7451











