प्रभासच्या ‘साहो’ बद्दल प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता

मुंबई: प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या बहुचर्चित ‘साहो’ चित्रपटाचा शनिवारी ट्रेलर लाँच झाला. चित्रपटाची गाणी आणि टिझरनंतर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. साहोच्या हिंदी ट्रेलरला एका दिवसातच यूट्यूबवर १४,४०८,४७० व्ह्यूज मिळाले आहेत.
अॅक्शन आणि रोमान्सचा तडका ट्रेलरमध्ये दिसत आहे. चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधील ५० जणांची एक टीम भारतात बोलवण्यात आली होती. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी पहिलेच चित्रपटाला ब्लॉकब्लास्टर ठरवलं आहे. तसंच या वर्षात साहो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार असल्याचं मतही चाहत्यांनी व्यक्त केलं.