बिग बॉस मराठीत सलमान घेणार स्पर्धकांची शाळा

मुंबई: बिग बॉस मराठी मालिकेत एरव्ही, वीकेंडचा डावमध्ये घरातील सदस्यांची शाळा घेताना आपल्याला महेश मांजरेकर दिसतात, पण यावेळी खुद्द सलमान सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.

आजच्या भागात महेश मांजरेकर घरातील सदस्यांची ओळख सलमानला करून देताना बिचुकलेंची तक्रार त्याच्याकडे करतात.

बिचुकलेंबद्दल असलेली तक्रार ऐकल्यानंतर सलमान म्हणतो, ‘हा शो असला तरी हे तुमचं घर आहे…मग तुम्ही टॉयलेट साफ का करत नाही? मी स्वत: माझ्या घरातील टॉयलेट साफ करतो, त्यात काही कमीपणा नाही’…अभिजीत बिचुकलेंच्या केसांवरून सलमान बिचुकलेंची ‘केस’ घेतानाही दिसणार आहे. ‘तुम्ही तुमच्या केसांनीच आता स्टाईलमध्ये ते टॉयलेट धुवा’ असं म्हणत तो त्यांना खडसावतो.