
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women’s Day) गुगलने मोठी घोषणा केलीय. गुगलने भारतातील दहा लाख महिला उद्योजकांना मदत करण्याचे आश्वासन दिलेय. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी शनिवारी ही घोषणा केली.
भारतासह सुंदर पिचाई यांनी जगातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी 2.5 कोटी डॉलर्स देण्याची घोषणा केली. हे पैसे भारत आणि जगभरातील ना नफा तत्त्वावर आणि सामाजिक उपक्रमांना अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. सुंदर पिचाई म्हणाले की, भारतातील खेड्यांमधील 10 लाख महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, साधने आणि सदस्यता यांच्या माध्यमातून गुगल इंटरनेट सााााठी कार्यक्रमात मदत करणार आहे.
गुगलने आज गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात 1 लाख महिला वर्कर्ससाठी Google.org कडून 50 हजार डॉलरच्या निधीची घोषणा केली, जो निधी Nasscom फाऊंडेशनला महिलांच्या पाठिंब्यासाठी दिला जाणार आहे. गुगलद्वारे दिलेल्या या फंडानंतर NASSCOM फाऊंडेशन भारतातील काही राज्यांमध्ये ग्रामीण महिलांना डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसाठी प्रशिक्षण देणार आहे.











