
मुंबई: मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ खोळंबली. रेल्वेचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला असून गाड्या उशिराने धावत आहेत.






