
तिरुवनंतपुरम, 10 फेब्रुवारी : महाभयंकर अशा कोरोनाव्हायरसला (Coronavirus) हरवण्यासाठी संपूर्ण जगाचे प्रयत्न सुरू आहे. भारताने मात्र हा लढा जिंकला आहे. भारतातील (India) पहिल्या 2 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. कोरोनाव्हायरसच्या या रुग्णांच्या रक्ताचे नमुने आता नेगेटिव्ह आलेत.
भारतात 30 जानेवारीला कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण केरळात आढळून आला. त्याच्यावर थ्रिसुर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू करण्यात आले. यानंतर केरळातच आणखी 2 रुग्ण सापडले. या तिन्ही रुग्णांना तात्काळ विशेष वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. हे तिघंही चीनच्या वुहानमध्ये शिकत होते.
भारतातील पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. या दोन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमुने केरळच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIA) मध्ये पाठवण्यात आले होते, ते नेगेटिव्ह आलेत. आता पुण्यातल्या इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीद्वारे मिळणाऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
कोरनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल?
हात स्वच्छ धुवा
शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा
सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका
प्राण्यांपासून दूर राहा











