MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रावर तसंच देशावर कोरोनाचं भीषण संकट आलेलं आहे. त्यामुळे जनजीवन पुर्णपूर्ण विस्कळीत झालेलं आहे. शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तसंच अनेक कोर्सेसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या अस्तानी. मात्र येत्या 5 एप्रिलला नियोजित असणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसचे माजी. प्रदेश पदाधिकारी ऋषिकेश देशमुख यांनी कही दिवसा पूर्वी ही नियोजित परीक्षा कोरोनाचं संकट जाईपर्यंत पुढे ढकलावी,अशी मागणी केली होती. 

मेहबूब शेख

विविध कोर्सेसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मात्र एमपीएससीच्या परीक्षेबाबत आणखी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. याचमुळे विद्यार्थी देखील संभ्रमात पडलेले आहेत. परीक्षा अगदी 15 दिवसांवर आलेली असताना आणि कोरोनाचा धोका टळलेला नसताना ही परीक्षा होऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थीने केलेली होती. 

ऋषिकेश देशमुख

मेहबूब शेख यांनी मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच देशमुख यांनी अजित पवार व राजेश टोपे यांच्याशी दुरध्वणीवरून संपर्क साधत एमपीएससीच्या परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती केलेली होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा केलेली आहे. 31 मार्चपर्यंत तत्वत: ही घोषणा आहे मात्र विषाणूचा प्रादुर्भाव जर आटोक्यात आला नाही तर नंतरच्या काळासाठीही लॉकडाऊन सुरूच ठेवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

परिपत्रक

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे सगळीकडंच घबराट निर्माण झालेली असताना विद्यार्थी या काळात अभ्यास तरी कसे करणार? यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने ही परीक्षा पुढे ढकलावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेख व देशमुख यांनी केली होती. तसंच विद्यार्थी वर्गातूनही ही मागणी जोर धरू लागली अस्तानी. 5 एप्रिल 2020 होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 26 एप्रिल 2020 घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.