
मुंबई – देशात व राज्यात संचारबंदी असताना ट्रेन सुरु होणार या ही अफवा कोणी पसरवली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच या प्रकरणी चौकशी करुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
मुंबईतील वांद्रे भागात आज हजारो मजुरांचा जमाव जमला होता.
लॉकडाउन वाढवला तरीही ट्रेन सुरु होतील अशी आशा त्यांना होती.
त्यामागचे कारण ही अफवा होती.
या अफवेमुळेच सगळा जमाव जमला होता.
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करण्यात आला.
आता ही अफवा कुणी पसरवली त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
Lockdown21 च्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध MahaCyber1 ने दाखल केले १९६ गुन्हे, ३७ जणांना अटक
आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी ९३ गुन्हे, फेसबुक पोस्ट्स फॉरवर्ड प्रकरणी ६१ गुन्हे, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे, तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी २ गुन्हे व अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी २७ गुन्हे दाखल.











