धूम्रपान टाळा आयुष्य वाढवा

धूम्रपानामुळे कर्करोग आणि हृदय विकार असा दुहेरी धोका संभवतो पण अनेकजण याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात आणि स्वतःवर संकट ओढावून घेतात. धूम्रपानामुळे खासकरून तंबाखूच्या सेवनाने श्वसन नलिका, फुफ्फुस आणि तोंडात कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. परंतु धूम्रपानामुळे हृदयाचे कार्य बंद पडून हृदय विकार होण्याचाही धोका मोठा असतो आणि हेच बऱ्याच जणांना माहीत नसते त्यामुळे दरवर्षी लाखोंजनांना आपले प्राण गमवावे लागतात. हृदय निकामी होणे किंवा हळू हळू हृदयाच्या हालचाली मंदावणे, हृदयाचे कार्य मंदावणे, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे इत्यादी धोके धूम्रपानामुळे निर्माण होतात. या सर्वाचा परिणाम रक्ताभिसरण क्रियेवर होते आणि हार्ट फेलुअर चा धोका निर्माण होऊन जीव गमावू शकता. यासाठी धूम्रपान पूर्ण बंद करावे त्याचबरोबर नियमित व्यायाम करावा. शरीराचे वजन नियंत्रित ठेवावे व शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू देऊ नये.