सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं आज सकाळी ११.४५ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या.