
उल्हासनगर – करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या ९ जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनाग्रस्त व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला जाणं हे एका कुटुंबातील ९ जणांना चांगलंच भोवलं आहे.
मागच्या आठवड्यात उल्हासनगरच्या खन्ना कंपाउंड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा मध्यवर्ती रुग्णालयात मृत्यू झाला होता.दरम्यान हा करोना संदिग्ध रुग्ण असल्याने त्याचा मृतदेह रुग्णालयाने द्यायला नकार दिला होता.
मात्र कोविड १९ च्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करणार असल्याचे नातेवाईकांनी लेखी लिहून दिले होते.
मात्र नातेवाईकांनी मृताचे पार्थिव उघडले आणि अनेकांनी त्या मृतदेहाला स्पर्श करीत नियम पायदळी तुडवले.
ही माहिती महापालिकेला कळताच ७० जणांना क्वारंटाइन करण्यात आलं. त्यातल्या ९ जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर दोघांना करोनाची लागण झाली आहे
या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.











