राज्यात १ हजार १४० पोलिसांना कोरोनाची बाधा

मुंबई – कोरोनाच्या लढाईत आणखी २ पोलिस शहीद झाले आहेत.

तर एका दिवसात तब्बल ७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाने राज्यात आतापर्यंत १२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १४० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
 
कोरोनाच्या संकटात पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कोरोनाने त्यांना देखील आपल्या कवेत घेतले आहे.

त्यात आता आणखी दोन पोलीस कोरोना विरुद्धच्या युद्धात शहीद झाले आहेत.
 
एका दिवसात तब्बल ७९ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजार १४० वर पोहोचला आहे. यात १२० अधिकारी आणि १०२० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.