
नवी मुंबई: स्माईल्स फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा श्री धिरज आहुजा साहेब व मा सौ उमा आहुजा मँडम यांच्या आर्थिक सहकार्याने मा सौ संगिता अल्फन्सो सह्यायक पोलिस आयुक्त नवी मुंबई , मा सौ माया मोरे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांच्या विशेष सहकार्याने व मा श्री राजेन्द चव्हाण साहेब वरिष्ठ पोलिस निरिक्षक नेरूळ नवी मुंबई यांच्या हस्ते विशेष देखरेख खाली गोर गरीब महिला रिक्षा चालक यांना तांदूळ तुरदाळ , मास्क , सिनिटायझर व प्रत्येकाच्या लहान मुलांना दोन्ही हातात बसत नव्हते ऐवढा खाऊ वाटप केला.
जवळजवळ ४० ते ४५ दिवस सर्व रिक्ष बंद असल्यामुळे सर्व चालक चितेत होते स्माईल्स फाऊंडेशन चे श्री आहुजा साहेबांनी आज आम्हांला जी मदत केली , ती आम्ही कधीच विसरू शकत नाही असे रिक्षा चालक हात जोडून बोलत होते .
हे सर्व वाटप करतेवेळी सरकारच्या नियमानुसार सर्व अटी पाळून व शिस्तबद्ध असे धान्य वाटप केले . आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई, श्री सोपान जेजुरकर वाहतूक उपाध्यक्ष नेरूळ , श्री विजय नलावडे वाहतूक उपाध्यक्ष वाशी, श्री सय्यद भाई उपाध्यक्ष ऐरोली , श्री अनिल टाकळकर, स्टँड प्रमुख श्री शाम शेलार , रिक्षा महिला विभाग अध्यक्षा सौ संगिताताई आमले संस्थापक अध्यक्षा त्रिमुर्ती महिला मडंळ नेरूळ तसेच दोस्ती गुर्प प्रमुख सदिप मेहेर जय पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
हा कार्यक्रमात अनेक मान्य वरांनी सहकार्य केले व स्माईल्स फाऊंडेशन या सर्वाचे मी श्री दिलिप किसनराव आमले रिक्षा टँक्सी वाहतूक सेना सेवा भावी संस्था च्या सर्व रिक्षा चालक सभासदांनच्या वतीने आभार मानले.












