लवकरच येणार या चीनी ऍपवर बंदी?, ही’चिनी अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक

लडाख मधील घटनेनंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले असताना आता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सरकारला धोकादायक चीनी ऍपची यादी सादर केली आहे आणि या ऍपवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या या यादीला आणि या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शवला आहे. ही अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सरकारला कळवण्यात आल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. 

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स (ban china app)वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिली आहे. 

यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे,”असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक अ‍ॅपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

चिनी कंपन्यांनी बनवलेले किंवा चीनमधील कंपन्यांच्या मदतीने बाजारामध्ये दाखल झालेले अ‍ॅप्स हे हेरगिरी तसेच मालवेअर पसरवण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता अनेकदा व्यक्त कऱण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांसंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींने हे अ‍ॅप्स वापरु नयेत अशा संदर्भातील सूचनाही करण्यात आल्याच्या बातम्याही मागील काही काळापासून सातत्याने समोर येत आहेत. माहिती सुरक्षित राहण्यासंदर्भात साशंकता निर्माण होत असल्याने असे अ‍ॅप्स वापरु नये असं सांगण्यात आलं होतं.

चीनी कंपन्यांचे ऍप खालील प्रमाणे आहेत

TikTokVault-

HideVigo

VideoBigo

LiveWeibo

WeChat

SHAREit

UC News

UC Browser

BeautyPlus

Xender

Club Factory

HeloLIKEK

waiROMWESHEIN

Zoom

NewsDog

Photo Wonder

APUS Browser

VivaVideo-

QU Video

IncPerfect

CorpCM Browser

Virus Cleaner (Hi Security Lab)

Mi Community

DU recorder

YouCam

MakeupMi

Store360

Security

DU Battery

SaverDU

BrowserDU

CleanerDU

PrivacyClean Master –

CheetahCacheClear

DU apps studio

Baidu Translate

Baidu

MapWonder

CameraES

File ExplorerQQ

InternationalQQ

LauncherQQ

Security CentreQQ

PlayerQQ

MusicQQ

MailQQ

NewsFeed

WeSync

SelfieCity

Clash of Kings

Mail Master

Mi Video call-

XiaomiParallel Space