
मुंबई – कालच राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा झाला. कोरोनचं संकट साऱ्या देशावर आहे त्यात राज्यात फारच गंभीर परिस्थिती आहे. राज्यात भाजपाला धोबीपछाड देवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होवून जवळपास सहा महिने पूर्ण झाले. सत्तेत सहभागी झाल्याने सगळ्याच पक्षांन खासकरून सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांना पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तरी देखील गेल्या सहा महिन्यापासुन राष्ट्रवादीचे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष पद हे रिक्त आहे त्यामुळे कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राष्ट्रवादी संपेल म्हणून अनेक नेते सोडून गेले पण कार्यकर्त्यांमुळेच पक्ष भक्कम राहीला आशा भावना देखील त्यांनी आपल्या फेसबुक लाइव च्या माध्यमातून कार्यकरत्यानां सांगितल्या.
विधानसभा नंतर सत्ता स्थापनेस लागलेला वेळ आणि नंतर कोरोनाचा राज्यात वाढता प्रादुर्भाव या मुळे सत्ताधारी पक्षांच्या संघटनेतिल निवडी या थाबलेल्या दिसत आहे. खरं तर सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहेत.
फेब्रुवरी मधे अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्या मुळे अजिंक्य पाटिल यांनी आपल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. त्यानंतर मधल्या काळात रिक्त झालेल्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटिल यांचे चिरंजीव रोहित पाटिल, मराठवाड्यातील ऋषिकेश देशमुख, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात,आकाश झांबरे,सनी मानकर,प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे ही प्रमुख काही नाव चर्चेत होती.
या व्यतिरिक्त राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अहमदनगर,सोलापुर,बीड, कोल्हापुरमधूनही इच्छूकांची नावं आता समोर येत आहेत.
त्यातच देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्याने अध्यक्ष पदाची निवड देखील लंबल्या गेली. या काळात देखील अध्यक्ष पदासाठी स्पर्धेत असलेले काही विद्यार्थी नेते विद्यार्थांचे प्रश्न त्यांच्या अडचणी, मागण्या या सरकार दरबारी मंडतानी दिसले. यासगळमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल दिसून येते. तरी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष पदाचा लवकरात लवकर निर्णय घेवून पक्ष संघटना बळकट करावी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.











