
रेड झोनमध्ये भरणार ऑनलाईन शाळा, मार्गदर्शक तत्त्वाना मान्यता
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभाग मार्गदर्शक तत्वे 2020-21 यांना मान्यता देत शाळा सुरु होण्याचे संकेत दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू झाले आणि सारेच शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं. अनेक परीक्षा रद्द करावे लागल्या तर निकाल वर्षभरातील सरासरी गुणांवर आधारित जाहीर झाले. जून महिना सुरू झाल्यावर नवीन शैक्षणिक वर्ष केव्हा सुरु होणार याविषयी पालक, शिक्षक आणि शाळा यांना नवीन शैक्षणिक वर्ष वेळापत्रक विषयी आतुरता होती. सगळेच संभ्रमात होते.
आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाच्या द्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठक हि शैक्षणिक वर्ष 2020-21 मार्गदर्शक तत्वे मान्यता याबाबत आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शैक्षणिक मार्गदर्शक तत्वे यांना मान्यता दिली असून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली असल्याचे समजते. तसेच रेड झोन मधील शाळा या ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.











