सुशांत सिंह राजपूत: untold mystery

काल 14 जून 2020 ही तारीख सकाळीच एक काळजाला चटका लावणारी घेवून आली आणि ती म्हणजे तरुण वयात लोकप्रियता मिळवून यशाच्या शिखरावर असणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्युची. खरं तर विश्वास बसत नव्हता. टीव्ही वर प्रत्येक चॅनेल पडताळून पाहिले मराठी, हिंदी आणि इंग्रजी सर्व न्यूज चॅनेलवर एकच बातमी की सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युची. मन एकदम सुन्न झालं हे कस शक्य आहे? शॉक तर तेव्हा बसला जेव्हा कळाले की, सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एवढा यशस्वी असणारा माणूस असे टोकाचे पाऊल उचलू शकतो? हो, दुर्दैवाने याचे उत्तर सुशांत सिंह याच्या आत्महत्येने हो मध्ये रुपांतर झाले होते.

बॉलिवूड मध्ये पदार्पण करून जेमतेम सात ते आठ वर्षे सुशांतला झाले असतील यादरम्यान त्याने टीव्हीवर पवित्र रिश्टा सारखी हिट हिंदी मालिका दिली आणि त्यानंतर काय पो छे या सुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केली. पुढे पी के, शुद्ध देसी रोमान्स, राबता, एम एस धोनी , केदारनाथ, छि छो रे असे एकापेक्षा एक हिट आणि बॉकसऑफिसवर गल्ला जमविनारे चित्रपट दिले. खरं तर त्याच्याकडे मोठ मोठ्या चित्रपटांची रांग लागलेली असायला हवी होती आणि तसं होत होतेच पण बॉलिवूड मधील एक लॉबी जी छोट्या शहरातून येणाऱ्या कलाकाराला स्थिर होवू देत नाही ती सक्रिय झाली.

सुशांत सिंह राजपूत हा मूळचा बिहार येथील पटणाचा, मेकानिकल इंजिनीरिंग असताना देखील त्याला बॉलिवूडची भुरळ पडली आणि तो स्वप्नपूर्तीसाठी मुंबईत आला. खरं तर कोणीही गॉडफादर नसताना यानगरीत टिकाव लागणे कठीण. अशा परिस्थितीतही सुशांत प्रयत्न करीत राहिला. सुरुवातीला एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून , एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम केले. काही दिवसांनी टीव्हीवर मालिकेत काम मिळविले किस देश में हैं मेरा दिल आणि नंतर तुफान लोकप्रिय ठरलेली पवित्र रीश्टा या मालिकेत काम केले. परंतु सुशांतचे यासगळत मन रमत नव्हते त्याचे स्वप्न मोठे होते स्ट्रगल करता करता त्याला काय पो छे चित्रपट मिळाला, त्याच्या दमदार अभिनयाने चित्रपट चालला. एन्ट्री अगदी मनासारखी झाली त्यानंतर एकामागोमाग एक अनेक हिट चित्रपट दिले त्यामध्ये प्रामुख्याने पीके, शुद्ध देसी रोमान्स, राबता, केदारनाथ, एम एस धोनी, छीं छो रे आदी चित्रपटांचा समावेश होतो. सर्व काही मनासारखं होत होते.

ही त्याची यशाची एक बाजू त्यासोबत त्याने अनेक स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित केले होते ज्यामध्ये स्वतःचे मुंबईत आलिशान घर, रेस कोर्स चे घोडे बाळगणे, चंद्रावर जमिनीचा तुकडा घेवून चंद्रावर जाऊन येणे यासाठी त्याने खास एक महागडी अंतराळ संशोधनात वापरली जाणारी महागडी दुर्बीण देखील खरेदी केली होती. याशिवाय, आलिशान गाड्या बाळगणे इत्यादी अनेक स्वप्ने त्याची होती.. त्याच्या निकट वर्तियांकडून कळते की त्याने अशा प्रकारे शंभर स्वप्ने लिहून ठेवले होते आणि त्यादिशेने तो अक्षरशः पळत होता. माणूस किती ध्येयवादी असू शकतो याच उदाहरण म्हणजे सुशांत सिंह राजपूत म्हणू शकतो. अशातच त्याच्या आयुष्याच्या दुसऱ्या बाजूला अनेक वेदना होत्या. आई फार लवकर स्वर्गवासी झाली होती, मुंबईत आल्यानंतर स्वतःच संसार थाटण्यासाठी त्याने जोडीदार निवडला पण त्यात अनबन झाले आणि ब्रेकअप झाले. दरम्यान पटाण्या सारख्या लहान शहरातून येवून कोणत्याही गॉडफादर नसताना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहणाऱ्या या नवतरुण कलाकारांविरोधात प्रस्थापित असलेल्या बड्या आसमीची लॉबी कार्यरत झाली आणि याचा परिणाम सुशांत ला मिळणाऱ्या नवीन चित्रपटांवर झाला. त्याला मिळालेल्या सात नवीन चित्रपटांपैकी जवळपास सहा चित्रपट काढून घेण्यात आले. त्याला आर्थिक चणचण भासू लागली. अशा परिस्थितीत सुशांत नैराश्येच्या गर्तेत सापडला. त्याने मनसापोचार तज्ञ आणि डॉक्टर यांची ट्रीटमेंट सुरू केली. आणि काल अचानक त्याने बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

येथे नमूद करावेसे वाटते की, समस्यांना आत्महत्या हे उत्तर असू शकते का? नाही मुळीच नाही. आत्महत्या म्हणजे आपल्याला मिळालेल्या अमूल्य जीवनाला नाकारण. आपल्या मनातील गुंतागुंत जवळच्या व्यक्तीबरोबर मन मोकळं करून मार्ग काढणे किंवा मित्रांसोबत सल्लामसलत करून उपाय शोधणं हे होवू शकत होतं. तसेच त्याच्या व्यावसायिक वाटचालीत येणाऱ्या अडथळ्यांना सुशंताने धेर्याने सामना करायला हवा होता. जर का त्याच्यावर तथाकथित बॉलिवूड लॉबी कडून अन्याय होत होता तर त्याने चव्हाट्यावर आणून वाचा फोडली पाहिजे होती. त्यातूनच त्याला भावी पिढ्यांसाठी सुद्धा वाट मोकळी करून देता आली असती.

असं अचानक टोकाचं पाऊल उचलून आयुष्य संपवणं केव्हाच मान्य होवू शकत नाही. मनुष्य किती कुमकुवत होवू शकतो हे या घटनेने दाखवून दिले. माणसाची जीवन शैली बदलत आहे आणि त्याच्या व्यावसायिक हव्यासापोटी नातीही दुरावत आहेत. भौतिक सुखाच्या शोधात खऱ्या आयुष्याचा आनंद घेण्याचा विसर पडला आहे. जे आहे त्यात समाधानी न राहता अजून पाहिजे या विचाराने चित्त विचलित करीत आहेत. याचाच परिणाम म्हणजे पाहिजे ती गोष्ट मनासारखी नाही झाल्यास चिडचिड करणे, स्वतःवरचे नियंत्रण गमावणे.

सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नाही आणि अचानकपणे त्याने स्वतःच आयुष्य संपवून एक रहस्य बनून राहिला आहे.