भारत-चीन सैन्यांमधील चकमकित २० भारतीय जवान शहीद,प्रतिहल्ल्यात चीनचे ४३ जवान टिपले

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनबरोबर झालेल्या सशस्त्र चकमकीत किमान २० भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

शहीद जवानांची संख्या वाढू शकते, अशी भीती संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनच्या ४३ सैनिकांचा मृत्यू झाला आणि तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत, या वृत्तालाही दुजोरा मिळाला आहे.