डान्स करोना डान्स ” राज्यस्तरीय ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धेत सिंधुदुर्गातील डान्सर्सचे वर्चस्व.

“डान्स करोना डान्स ” राज्यस्तरीय ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धेत सिंधुदुर्गातील डान्सर्सचे वर्चस्व.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, 1 जून ते 10 जून पर्यंत चाललेल्या या स्पर्धेला ५ राज्यातून आणि महाराष्ट्राच्या १३ जिल्ह्यातून शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

कोकण संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर डान्स करोना डान्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना मुळे लॉक डाऊन मध्ये अडकलेल्याच्या नृत्य कौशल्य गुणांना वाव मिळावा तसेच घरबसलेल्याचे मनोरंजन व्हावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आज दिनांक 20 जून रोजी या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक – नंदिनी बिले, (सावंतवाडी) द्वितीय पारितोषिक – स्वरांगी खानोलकर (सावंतवाडी) आणि तृतीय पारितोषिक – समर्थ गवंडी,(रेडी, वेंगुर्ले) याला मिळाले आहे. त्याच बरोबर धनश्री गिजे (मुंबई), सांची साटम (देवगड), राशी आळके (मुंबई,) सुयोग पाखरे (रत्नागिरी), फ्लाव्या अम्रानिया (मीरा रोड, ठाणे), नेहा जाधव (इन्सुलि) याना उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १००० रुपये आणि सन्मानपत्र तर दोन आणि तीन क्रमांकांना अनुक्रमे ७०० आणि ५०० रुपये आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झालेल्याना प्रत्येकी सन्मानपत्र आणि २०० रुपये पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.

या स्पर्धेला स्मितल राणे, गौरी बांदेकर आणि कल्पना राणे परीक्षक म्हणून लाभले तर विश्वनाथ बेटकर, सुरज कदम, रुपेश परब, नलिनी चव्हाण,प्रवीण परब,समृद्ध राणे,सुरेंद्र पेवेकर, निलेश मोरजकर शशांक सावंत यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हातभार लावला.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे कोकण संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी आभार व्यक्त केले आहेत.